Sunday, April 20, 2025

Election : कोल्हापुरातून निवडणूक कशी लढतो हे पाहण्यासाठी…; चंद्रकांत पाटलांनी दिलं थेट आव्हान

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक (Election) जाहीर झाली आहे. यामध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा रंगणार आहे. भाजपकडून विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महाविकासआघाडीकडून काँग्रेससाठी ही जागा सोडण्यात आली असून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांची उमेदवारी जवळपास निश्चत झाल्याची चर्चा आहे.

भाजपने कोल्हापूर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजय आमचाच होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. आज भाजपकडून कोल्हापूरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.

कोल्हापुर उत्तर पोटनिवडणूकीसाठी (Election) भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. विश्वजीत कदम यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपकडून दसरा चौकातून रॅली काढण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील हेसुद्धा सहभागी होते. यावेळी त्यांनी कोल्हापुर उत्तर पोटनिवडणूकीमध्ये भाजपा १०० टक्के विजयी होणार. मातधिक्य किती हे निवडणूकीत जवळ येईल तेव्हा ठरले, असं म्हणत विजयाचा दावा केला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक भाजपने लादली असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ही निवडणूक बंटी पाटील यांच्या अहंकारापायी लादली गेवी आहे. ज्या काही निवडणूका येतील त्या मला द्या, असा त्यांचा स्वभाव आहे.

गोकुळ निवडणूक, जिल्हा बँक निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक (Election) सर्व निवडणूका मला द्या, अशा त्यांच्या स्वभावाने ही निवडणूक लादली गेली.दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर निवडणुक लढवण्याबाबत विचारलं असता त्यांनी, आता तर फक्त सत्यजित कदम लढत आहेत आणि ते विजयी होणारच आहेत. केव्हा तरी मी कसा लढतो हे पाहण्यासाछी एकानं राजीनामा देऊन दाखवा, असं थेट अव्हान त्यांनी दिलं आहे.

तसंच, ज्या बंटी पाटलांनी शेत पाइपलाइनचं पाणी नाही आलं तर निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं होतं त्याचं काय झालं, असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळं ही निवडणूक ५० वर्ष काँग्रेसची व ५ वर्ष भाजपची अशी लढवणार आहोत. आम्ही ५ वर्षात काय केलं हे मांडतो तुम्ही ५० वर्षात काय केलं ते सांगा, असंही ते म्हणाले आहेत.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म