तालिबानने सत्ता ताब्यात घेतलेल्या अफगाणिस्तानमध्ये मुलींचे शिक्षण (Teaching) पुन्हा सुरू होण्याच्या आशेला पुन्हा एकदा ग्रहण लागले आहे. कारण, तालिबानने आज (बुधवार) अफगाणिस्तानमधील मुलींच्या माध्यमिक शाळा उघडल्यानंतर काही तासांतच त्या पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. एका अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामुळे कट्टर इस्लामी गटाच्या धोरणांबाबत जनतेमध्ये विरोधाभास निर्माण झाला आहे.
मुलींना घरी परत जाण्यास सांगितल्याबाबत तालिबानचे प्रवक्ते इनामुल्ला समंगानी यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नवार प्रतिक्रिया देताना त्यांनी एएफपी वृत्तसंस्थेला “होय, हे खरे आहे,” असे सांगितले आणि या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.
Election : कोल्हापुरातून निवडणूक कशी लढतो हे पाहण्यासाठी…; चंद्रकांत पाटलांनी दिलं थेट आव्हान
एएफपी वृत्तसंस्थेची टीम मुलींच्या शाळा सुरू झाल्याने राजधानी काबुलमधील जरघोना हायस्कूलचा व्हिडिओ करत होती, त्याचेवेळी एक शिक्षक आला आणि त्याने सर्व मुलींना घरी जाण्याचे आदेश दिले.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर मुली पहिल्यांदाच वर्गात परतल्या होत्या, परंतु नवीन आदेश मिळाल्यानंतर त्या पाणावलेल्या डोळ्यांनी घरी परतल्या.
नवीन तालिबान सरकारला मान्यता देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रत्येकासाठी शिक्षणाचा (Teaching) अधिकार हा चर्चेचा मुख्य मुद्दा म्हणून ठेवला आहे.