महाराष्ट्र– कर्नाटक सीमाप्रश्न (Boundary) अस्तित्वातच नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील बेळगावचा प्रश्न संपलेला आहे असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरु इथे केलं. महाराष्ट्रातील नेते नागरीकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा वाद उकरून काढत आहेत असा आरोप बोम्मई यांनी केला. कर्नाटकात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या वक्तव्यावर सीमाभागातून संताप व्यक्त होत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर एक व्यंगचित्र शेअर केले. ज्यामध्ये ‘बेळगाव फाईल्स’ या ‘काश्मीर फाईल्स’पेक्षा भयंकर आहेत असं म्हटलं आहे. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी सीमाप्रश्न (Boundary) संपलेला आहे असे वक्तव्य केलं. बोम्मई यांचं हे विधान वादग्रस्त ठरणार असून, त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने १९५६ साली केलेल्या भाषावार प्रांतरचनेत कन्नड भाषिकांची मोठी संख्या असलेले सोलापूर, अक्कलकोट परिसर महाराष्ट्राला दिला. त्याबदल्यात कर्नाटकला बेळगाव मिळाले होते.त्यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न (Boundary ) अस्तित्वातच नाही. महाराष्ट्रातील नेते नागरीकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा वाद उकरून काढत आहेत असेही बोम्मई म्हणाले.
संजय राऊतांनी केले व्यंगचित्र शेअर
संजय राऊत यांनी या व्यंगचित्रामध्ये बेळगाव फाईल्स काय कमी भयानक आहेत? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या व्यंगचित्रात त्यांनी भाषिक गळचेपी, लोकशाहीचा खून, मराठी तरूण असे मुद्दे उपस्थित केले आहेत.