देशात कोरोना रुग्णांची सख्या आटोक्यात आलेली असताना, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरातील देशांना पुन्हा एकदा सावध केले आहे. कारण पाश्चात्य देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे गेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर कोरोनाव्हायरस संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या 7 टक्क्यांनी वाढली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी इशार दिला आहे की जोपर्यंत सर्व देशांमध्ये संपुर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत जग वाढत्या कोरोना साथ आणि त्याच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटशी लढत राहील.
“आपल्या सर्वांना साथीच्या आजाराला मागे टाकून पुढे जायचे आहे. परंतु आपली कितीही दूर जावे अशी इच्छा असली तरी, ही महामारी संपलेली नाही. जोपर्यंत आपण सर्व देशांमध्ये मोठ्या स्तरावर लसीकरण कव्हरेज होत नाही तोपर्यंत, आपल्याला संसर्ग वाढण्याचा धोका आणि नवीन व्हेरिएंट्सना तोंड द्यावे लागेल ”, असे डब्लूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस म्हणाले.
डब्ल्यूएचओने यापूर्वी सांगितले होते की, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची नोंद कमी झाली असतानाही, पाश्चिमात्य देशांमध्ये वाढत्या संसर्गामुळे गेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर नवीन कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या 7 टक्क्यांनी वाढली आहे.
“कोविड-19 रुग्णांच्या संख्येत जागतिक वाढ सुरूच आहे, आशिया खंडात मोठा प्रादुर्भाव झाल्याने आणि युरोपमधील ताज्या लाटेमुळे अनेक देश आता कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनचा सर्वाधिक मृत्यू दर पाहत आहेत. यावरुन ओमिक्रॉनचा प्रसार किती वेगाने होतो हे दिसून येते आणि ज्यांना लसीकरण केलेले नाही त्यांच्यासाठी मृत्यूचा धोका वाढतो, विशेषत: वृद्ध लोक” असे गेब्रेयसस म्हणाले.
“We all want to move on from the pandemic. But no matter how much we wish it away, this pandemic is not over. Until we reach high vaccination coverage in all countries, we will continue to face the risk of infections surging & new variants emerging that evade 💉”-@DrTedros
— World Health Organization (WHO) (@WHO) March 23, 2022