सूर्यग्रहण (Solar Eclipse) आणि चंद्रग्रहण या खगोलशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या घटना मानल्या जातात. ज्योतिषशास्त्रातही सूर्य आणि चंद्र ग्रहणाला विशेष मानलं गेलं आहे.सूर्यग्रहणादरम्यान चंद्र सूर्याला पूर्णपणे व्यापून टाकतो.
त्यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीवर पोहोचू शकत नाहीत. ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण अशुभ मानलं जातं. या वर्षी म्हणजेच 2022 मधलं पहिलं सूर्यग्रहण 30 एप्रिलला आहे.
या सूर्यग्रहणाचा (Solar Eclipse) परिणाम राशीचक्रातल्या बाराही राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. कर्क आणि मीन या दोन राशींना ते शुभ ठरेल, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. याबाबतची माहिती देणारं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. 30 एप्रिल 2022 रोजी सूर्यग्रहण असून, त्याचा परिणाम सर्व राशींच्या जातकांवर दिसून येणार आहे.
बारा राशींवर ग्रहणाचा कसा परिणाम होईल, ते जाणून घेऊ या.
मेष : मेष राशीच्या जातकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी पैशांशी निगडित कोणतंही काम करणं टाळावं.
वृषभ : वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहणाच्या दिवशी आत्मविश्वास कमी जाणवेल.त्या दिवशी अनावश्यक राग किंवा तणाव टाळावं.
मिथुन : सूर्यग्रहणाच्या दिवशी मिथुन राशीच्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. तसंच तुमच्या आजूबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवावं आणि काळजी घ्यावी.
कर्क : या राशीच्या जातकांसाठी सूर्यग्रहण निश्चितच चांगलं असेल.कौटुंबिक जीवनातल्या समस्या दूर होतील. तसंच आर्थिक समस्या संपुष्टात येतील.
सिंह : या राशीच्या व्यक्तींना व्यापारातून धनलाभ होण्याची शक्यता आहे; मात्र सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणं टाळावं.
कन्या : सूर्यग्रहणाच्या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना यशप्राप्तीसाठी जास्त मेहनत करावी लागेल.या कालावधीत नोकरी बदलण्याचा प्रयत्न टाळावा.
तूळ : तूळ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्यग्रहण थोडं नकारात्मक ठरेल. ग्रहणादरम्यान आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. कायदेशीर वाद टाळावेत.
वृश्चिक : सूर्यग्रहणामुळे वृश्चिक राशीच्या जातकांना नोकरीमध्ये अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याशिवाय व्यवसायातही आर्थिक अडचणी जाणवतील.
वृश्चिक : सूर्यग्रहणामुळे वृश्चिक राशीच्या जातकांना नोकरीमध्ये अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याशिवाय व्यवसायातही आर्थिक अडचणी जाणवतील.
धनू : सूर्यग्रहणादरम्यान आरोग्य चांगलं राहील; पण अतिआत्मविश्वास दाखवणं टाळा. ग्रहण काळात स्वभाव सौम्य ठेवावा.
मकर : मकर राशीच्या जातकांनी ग्रहण कालावधीत मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसंच सट्टेबाजी, जुगार टाळावा.
कुंभ : ग्रहण काळात गुंतवणुकीत नुकसान होऊ शकतं. कौटुंबिक वादामुळे मनःस्वास्थ्य बिघडेल.जोडीदाराच्या बोलण्याने त्रास होऊ शकतो. कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी धीर धरावा.
मीन : हे सूर्यग्रहण मीन राशींच्या व्यक्तींसाठी चांगलं असेल. व्यवसायात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. याशिवाय शत्रूंवर मात कराल.