Saturday, April 19, 2025

Cricket :अखेर धोनीच्या खास खेळाडूला भारतात एन्ट्री, CSK ला मिळाला मोठा दिलासा

आयपीएल (Cricket ) 15 व्या सिझनच्या सुरुवातीला केवळ दोन दिवस उरले आहेत. अशातच आयपीएलच्या जगताता अनेक घडामोडी घडत आहेत. पहिला सामना गतविजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट राइडर्स  यांच्यात खेळवला जाणार असून सामन्यापूर्वी चेन्नईसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कर्णधार महेंद्र सिंह धोनी चाधुरंधर खेळाडू मोईन अलीला अखेर भारतात येण्याची परवानगी मिळाली असून तो लवकरच संघात सामील होणार आहे.सीएसकेने मेगा लिलावापूर्वी इंग्लंडचा डॅशिंग अष्टपैलू मोईन अलीलाही कायम ठेवले. गेल्या मोसमात संघाला चॅम्पियन बनवण्यात मोईन अलीचे मोठे योगदान होते.

पण मोईन अली व्हिसाच्या कारणामुळे आयपीएल 2022 चा पहिला सामना खेळू शकणार नाही. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, व्हिसा मिळाला असून तो सीएसकेच्या दुसऱ्या सामन्यापासून निवडीसाठी उपलब्ध होईल. चेन्नईचा दुसरा सामना 31 मार्च रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे.

वास्तविक, मोईनला भारतात जाण्यासाठी आणि (Cricket ) टी-20 लीगचा भाग होण्यासाठी अद्याप मंजुरी मिळालेली नव्हती, परंतु आता तो बुधवारपर्यंत मुंबईत पोहोचेल. भारतात पोहोचल्यानंतर इंग्लिश अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला अनिवार्यपणे 3 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. त्यामुळे त्याला चेन्नईकडून पहिला सामन खेळता येणार नाही

मोईनने 28 फेब्रुवारी रोजी व्हिसासाठी अर्ज केला होता, मात्र 20 दिवसांहून अधिक काळ लोटल्यानंतरही त्याला व्हिसा मिळू शकला नाही, प्रवासाची कागदपत्रे मिळाली नाहीत. कागदपत्रे मिळाल्यानंतर तो पुढील फ्लाइटने भारताला रवाना होईल, असेही मोईनने यापूर्वी फ्रँचायझीला सांगितले होते.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म