बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराकायमच वेगवेगळ्या कारणांवरून सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असते. वर्कआउट रुटीनचा तिचा लुक असो किंवा एखाद्या कार्यक्रमातला फॅन्सी ड्रेस लुक असो, चाहते नेहमीच तिचं कौतुक करतात. मलायकाचा ड्रेसिंग सेन्स आणि तिचा अपिअरन्स चाहत्यांना कायमच आकर्षित करत असतो. सध्या मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत मलायका रेड कार्पेटवर पापाराझींसमोर पोज देत आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाच्या ग्लॅमरस लुकसह तिच्यातला खट्याळपणाही दिसून आला.मलायकाने काळ्या रंगाचा फिश शेपचा गाउन घातला होता. यासोबतच तिने स्मोकी आयमेकअप करून टाइट पोनी घातली होती आणि गळ्यात एक सुंदर नेकलेस परिधान केला होता. या लुकमध्ये मलायका खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती.
हा सुपर क्लासी ड्रेस परिधान करून मलायका रेड कार्पेटवर फोटोग्राफर्सना पोज देत होती, तेव्हा अचानक एक लहान मुलगा मलायकासमोर येऊन उभा राहिला. या मुलाने तिच्या ड्रेसला मॅचिंग असलेला ब्लॅक कलरचा कोट आणि पँट घातली होती. त्याला पाहताच तिने त्याच्याशी हस्तांदोलन केलं. यानंतर मलायकाने त्याला ‘तू आज रात्री माझ्यासोबत डेटला येशील का?’ असा प्रश्न विचारला. हे ऐकून तो मुलगा हसू लागला.
मलायकाच्या फॅन्सनी तिच्या या कृतीची प्रशंशा केली आहे. काहींनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करून, ‘ती जरी हे चेष्टा म्हणून बोलली असेल तरी यामुळे अर्जुन कपूरचं मन नक्कीच दुखावलं असणार,’ असं म्हटलं आहे. या व्हिडीओत पुढे मलायका त्या मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवते आणि आजूबाजूच्या उपस्थितांना विचारते, की हा कोणाचा मुलगा आहे? तो हरवला आहे का?
मलायका अरोराचे फॅन्स तिच्या लुकचं, तिच्या फिटनेसचं कौतुक तर करतातच; मात्र काही जण तिच्या ड्रेसिंगमुळे तिला ट्रोलदेखील करतात. हा व्हिडीओ पाहून जसं काही जणांनी मलायकाचं कौतुक केलं, तसंच काही दिवसांपूर्वी तिच्या लुकमुळे काही सोशल मीडिया (Social Media) युझर्सनी तिला ट्रोलदेखील केलं होतं.
काही दिवसांपूर्वी मलायका मुंबईतल्या एका सलूनबाहेर स्पॉट झाली होती. मलायका सलूनमधून बाहेर पडून कारमध्ये बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हाच्या मलायकाच्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तेव्हा मलायका अरोरा डीप नेक रॅप-अप ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत होती. परंतु काही जणांना तिचा ड्रेसिंग सेन्स आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.