काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारने विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स‘चं कौतुक केलं होतं. या चित्रपटाने (Cinema ) प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये परत आणल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे. तसंच यातला अनुपम खेर यांचा अभिनय त्याला खूप आवडला असल्याचं त्याने सांगितलं.
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी रिलीज झाला. कमी बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे, त्याने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. बरोबर एक आठवड्याने म्हणजे १८ मार्च रोजी अक्षयचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट रिलीज झाला. चाहते अक्षयचा हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले. त्यावेळी ओडिशातील थिएटरमध्ये एका गटाने चाहत्यांना हा चित्रपट पाहण्यापासून रोकलं असल्याची बातमी समोर येत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत भगवा स्कार्फ घातलेला एक गट अक्षयच्या ‘बच्चन पांडे’च्या स्क्रीनिंगमध्ये व्यत्यय आणताना दिसतो आहे आणि धमकी देत आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार,या जमावाने जबरदस्तीने बच्चन पांडे चित्रपटाचं (Cinema ) प्रदर्शन रोखलं आणि ‘द काश्मीर फाइल्स’ प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे.
ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.थिएटर मालकांना अशा समस्येला सामोरं जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. बॉलिवूड हंगामानुसार, एका प्रेक्षकाने दावा केला आहे की १०० लोकांचा गट या परिसरात गोंधळ घालत आहेत. अशाच एका गटाने चित्रपटातील एक सीन कट केल्याचा दावा करत थिएटर कर्मचाऱ्यांशी भांडण केलं. ‘कोणताही थिएटर मॅनेजर कोणत्याही चित्रपटातील सीन कसा कट करू शकतो का?’,असं एकाने पोर्टलला सांगितलं
.अक्षयच्या या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला केवळ ३४ कोटींची कमाई केली. दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ने ११ दिवसांत अंदाजे १८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाला (Cinema) गेल्या आठवड्यात अक्षय कुमारचा पाठिंबा मिळाला. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या या अभिनेत्याने अनुपम खेर आणि ‘द कश्मीर फाइल्स’च कौतुक करत ट्विट केलं.
Hearing absolutely incredible things about your performance in #TheKashmirFiles @AnupamPKher
Amazing to see the audience back to the cinemas in large numbers. Hope to watch the film soon. Jai Ambe. https://t.co/tCKmqh5aJG— Akshay Kumar (@akshaykumar) March 13, 2022