नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे आज वरदलक्ष्मी व्रत असून, वरदलक्ष्मी व्रतकथा जाणून घ्या..
श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा आणि जरा-जिवंतिका पूजन यासह वरदलक्ष्मीचे व्रत केले जाते. आज शुक्रवार, 15 सप्टेंबरला हे व्रत नक्की आचरावे. पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल, अशा व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे. दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात.
देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे आज वरदलक्ष्मी व्रत असून, वरदलक्ष्मी व्रतकथा जाणून घ्या…
कथा अशी आहे की… एकदा कैलासावर शिव-पार्वती सारीपाट खेळत होते. त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकरांच्या बाजूने निर्णय दिला. त्यावेळी रागावलेल्या पार्वतीमातेने त्या गणाला, तू कुष्ठरोगी होशील, असा शाप दिला.
मनोभावे ‘हा’ एक श्लोक म्हणा आणि घरबसल्या 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळवा!
परंतु, शिवाने त्याचा निर्णय योग्य होता, हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले. तसेच त्याला उ:शाप देण्यास सांगितले. तेव्हा पार्वती देवीने, एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करीत असतील. त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल, असे सांगितले.
त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून हे व्रत केले. परिणामी तो रोगमुक्त झाला, अशी वरदलक्ष्मी व्रत कथा पुराणात आढळून येते. घराच्या ईशान्य दिशेला मंडप घालून तिथे चौरंगावर कलशस्थापना करावी.
त्या कलशावर वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा करावी. देवीला एकवीस अपपूंचा नैवेद्य दाखवून पूजेला आलेल्या सर्व स्त्रिया, ब्राह्मणांना वाण द्यावे. देवीची कथा ऐकावी, असा ह्या व्रताचा विधी आहे. वरद लक्ष्मी व्रत केल्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!