सणासुदीचा काळ सुरु आहे. या दरम्यान विविध ई-कॉमर्स (e-commerce) वेबसाइटवर बंपर सूट मिळते. अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलही सुरु आहे. या सेलमध्ये आकर्षक बँक ऑफर्ससह हे डिव्हाइस खरेदी करता येतील.
कंपनी यावर वेगवेगळ्या बँक डिस्काउंट देखील देत आहे. हा धमाकेदार सेल 10 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यात सॅमसंगचे काही फोन अगदी कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. सॅमसंगच्या या बजेट स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला दमदार बॅटरीसह शानदार डिस्प्ले आणि प्रोसेसर मिळेल. चला तर मग जाणून घेऊया या ऑफरची सविस्तर माहिती.
Samsung Galaxy A04e
3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज (e-commerce) असलेल्या या फोनची MRP 11,299 रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही हा फोन 26 टक्के डिस्काउंटनंतर 8,400 रुपयांना खरेदी करू शकता. बँक ऑफरमध्ये फोनची किंमत आणखी 840 रुपयांनी कमी केली जाऊ शकते. हा फोन 407 रुपयांच्या मासिक EMI वर देखील खरेदी केला जाऊ शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 7,950 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो.
फोनमधील फीचर्स कोणते
कंपनी या फोनमध्ये 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. फोनमध्ये दिलेली बॅटरी 5000mAh आहे.
Samsung Galaxy M13
हा सॅमसंग फोन 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. त्याची MRP 14,999 रुपये आहे. हे 39 टक्के डिस्काउंटनंतर 9,199 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. कंपनी या फोनवर 8,650 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देत आहे. फोनचा EMI 446 रुपयांपासून सुरू होतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यूजर्स रॅम (e-commerce) प्लस फीचरच्या मदतीने फोनची रॅम 8 जीबी पर्यंत वाढवू शकतात.
फोनमधील फीचर्स कोणते
कंपनी या फोनमध्ये 6.6 इंच फुल एचडी+ इन्फिनिटी डिस्प्ले देत आहे. ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करणाऱ्या या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे. फोनच्या फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी फोनमध्ये 6000mAh बॅटरी देत आहे.