बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लान (Recharge)आणलाय. बीएसएनएलने प्रीपेड सीम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लान लॉन्च केलाय. या प्लानची वैधता ही ३५दिवसांची असणार आहे.
या प्लानसाठी खर्च मात्र नाममात्र आहे. या ३५ दिवसांच्या वैधतेसह व्हाईस कॉलिंग आणि डेटाचा लाभ देखील घेता येणार आहे. Jio आणि Airtel च्या ३० किंवा ३५ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी वापरकर्त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतात.
बीएसएनएलचा हा प्रीपेड रिचार्ज (Recharge) प्लॅन १०७ रुपयांचा आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ३५ दिवसांची पूर्ण वैधता मिळते. हा प्लॅन त्या वापरकर्त्यांसाठी आहे जे BSNL सिम दुय्यम क्रमांक म्हणून वापरतात.यामध्ये युजर्सना एकूण 3GB डेटाचा फायदा मिळणार आहे. तसेच, यात अमर्यादित इनकमिंग कॉल्स तसेच २०० मिनिटांच्या आउटगोइंग कॉलचा फायदा मिळणार आहे.
हे वाचा :कालपासून ‘वैलेंटाईन वीक’ला सुरूवात, कोणत्या दिवशी कोणता दिवस साजरा होणार
सरकारी टेलिकॉम कंपनीने अनेक टेलिकॉम सर्कलमध्ये आपली ४G सेवा सुरू केलीय. लवकरच कंपनी देशभरात ४G लाँच करणार आहे. या प्लानमध्ये यूजर्सना ३ GB हाय स्पीड डेटा मिळेल, त्याची मुदत संपल्यानंतरही यूजर्सना ४०kbps च्या स्पीडने अमर्यादित इंटरनेटचा लाभ मिळत राहील. त्याचवेळी, इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलचा लाभ वापरकर्त्याच्या सिममध्ये ३५ (Recharge) दिवसांसाठी मिळतो.