Tuesday, June 24, 2025

bike : बाईक स्टार्ट करताच खट-खट आवाज येतो का? काय असू शकतं कारण? घ्या जाणून

बाईक चालवणारे लोक हे नेहमीच बाईकमधून (bike) येणाऱ्या आवाजांमुळे त्रस्त असतात. अनेकांना तक्रार असते की, बाईक चालवणं सुरु करताच बाईकमधून खट-खट आवाज येतो आणि बाईक थांबल्यावर ती बंद होते.

मात्र याची अनेक कारणं असू शकतात. तुम्हीही बाईक चालवत असाल तर तुम्हाला याचं कारण अवश्य माहिती असायला हवं. जेणेकरुन तुम्ही हा प्रॉब्लम दूर करु शकाल. चला जाणून घेऊया बाईक चालवताना अशा प्रकारे आवाज का येतो.

1. चेन लूज झाल्यामुळे : बाईकची (bike) चेन लूज झाली तर त्यामधून खट-खट आवाज येऊ लागतो. ढीली चेन बाईकच्या चेन कव्हरवर आदळते. ज्यामुळे चेन कव्हरमधून असा आजा आला तर समजून जा की, चेन ढीली झाली आहे. ती टाइट करण्याची गरज आहे. लक्षात ठेवा की, लूज चेनमध्ये बाईक चालवल्याने चेन स्प्रॉकेटमधून उतरु शकते आणि हे अपघाताचे कारणही बनू शकते.

2. स्प्रॉकेट घासल्यानेही येतो आवाज : बाईक 10-15 हजार किलोमिटर चालली तर एकदा त्याच्या पुढे आणि मागच्या चेन स्प्रॉकेट बदलण्याचा सल्ला दिला जातो. बाईक जास्त चालल्यावर स्प्रॉकेट घासतात. अस झाल्यास बाईक पिकअप उशिरा घेईल आणि मायलेज देखील कमी होईल. चेन स्प्रॉकेट घासल्यानेही चेन वारंवार ढिली होते. तुम्ही ही मॅकेनिककडून ठीक करुन घेऊ शकता.

3. व्हील अलाइनमेंट खराब झाल्याने : बाईकचे (bike)  चाकं थोडेही वाकडे झाले तर त्याची अलाइनमेंट बिघडते. खराब रस्त्यांवर चालणाऱ्या बाइक्सचा व्हील अलाइनमेंट नेहमीच बिघडतो. हे स्पोक व्हीलच्या बाईकमध्ये जास्त असते. व्हील अलाइनमेंट बिघडल्याने जास्त स्पीडवर बाईक थरथरते. ज्यामुळे बॅलेन्स योग्य प्रकारे होऊ शकत नाही. बाईकची सर्व्हिसिंग करताना मॅकेनिककडून व्हील अलाइनमेंट चेक करा.

4. नटबोल्ट लूज झाल्याने : बाईक चालवताना हँडलमधून खट-खट आवाज आला तर हँडलचा नट लूज झाल्यामुळेही होऊ शकते. नट लूज असेल तर खराब रस्त्यांमध्ये गाडी चालवताना आवाज येईल. बाईकच्या हँडल किंवा समोरुन असा आवाज आला तर उशीर न करता मॅकेनिककडून चेक करुन घ्या.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म