Sunday, June 22, 2025

crude oil : ‘या’ 2 राज्यांत कमी झाले पेट्रोल-डिझेलचे भाव, पाहा महाराष्ट्रात काय स्थिती?

इंटरनॅशनल मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या (crude oil) किंमतींमध्ये किरकोळ घसरण झाली आहे. आज सकाळी 6 वाजता ब्रेंट क्रूड 82.07 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. तर क्रूड 78.54 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करतोय.

या दरम्यान देशात ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे लेटेस्ट रेट जारी केले आहेत. भारतात रोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या दरांमध्ये सुधारणा केली जाते. जून 2017 पूर्वी किंमतींमध्ये सुधारणा ही 15 दिवसांनंतर केली जात होती.

देशात केवळ केरळ आणि हरियाणामध्ये पेट्रोल-डिझेलच्या (crude oil) किंमती या कोसळल्या आहेत. तर उत्तर प्रदेशात किंमती वाढल्या आहेत. या व्यतिरिकत् इतर राज्यांमध्ये इंधनांच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. चला जाणून घेऊया प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे ताजे दर काय आहेत?

हे वाचा : पिकअप वाहन उलटल्याने भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रामध्ये आज पेट्रोलची सरासरी किंमत 106.97 रुपये प्रति लिटर आहे. तर गेल्या महिन्याच्या अखेरच्या तारखेला महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 107.06 रुपये प्रति लिटर होती. ज्याच्या तुलनेत किंमत आता 0.09 टक्के कमी झाली आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 106.97 रुपये प्रति लिटर राहिली.

राज्यात डिझेलची (crude oil) सरासरी किंमत 93.56 रुपये प्रति लिटर आहे. तर गेल्या महिन्याच्या अखेरच्या तारखेला महाराष्ट्रात डिझेलची सरासरी किंमत ही 93.69 रुपये प्रति लिटर होती. ज्याच्या तुलनेत किंमती आता 0.13 टक्के कमी झाल्या आहेत. गेल्या 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रात डिझेलची सरासरी किंमत 93.56 रुपये प्रति लिटर राहिली.

4 महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर :

  • – दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  • – मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • – कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  • – चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

जाणून घ्या तुमच्या शहरात काय सुरु आहे भाव :

  • -मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • -पुण्यात पेट्रोल 106.17 रुपये तर डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
  • -नाशिकात पेट्रोल 106.76 रुपये तर डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
  • -नागपुरात पेट्रोल 106.04 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • -अहमदनगरमध्ये पेट्रोल 105.96 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर
  • -छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल 107.21 रुपये तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
  • -अमरावतीत पेट्रोल 107.14 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
  • -अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  • -कोल्हापुरात पेट्रोल 106.56 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर (crude oil)
  • -सोलापुरात पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर
Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म