पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवाचा (IPL 2024) सामना करावा लागला. या सामन्यात पंजाबच्या शशांक सिंहने गुजरातच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलर खेळू शकला नाही.
त्याच्या जागी केन विल्यम्सनला संधी देण्यात आली होती. या सामन्यात केन विल्यम्सनने २२ चेंडूत २६ धावा केल्या. गुजरातचा डाव संपल्यानंतर केन विल्यम्सनने सांगितले की, डेव्हिड मिलर पुढच्या काही सामन्यात खेळू शकणार नाही. आयपीएल २०२२ पासून गुजरात टायटन्समध्ये डेव्हिड मिलर खेळतो. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने २७ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या होत्या.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (IPL 2024) १६ चेंडूत २१ धावांची खेळी केली होती. केन विल्यम्सनने गुजरातचा डाव संपल्यावर सांगितलं की, मैदानात उतरल्यावर चांगलं वाटलं. डेव्हिड मिलर एक दोन आठवड्यासाठी नसणे ही बाब चिंतेची आहे. डेव्हिड मिलरला दुखापत झाली असून त्यामुळेच त्याला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात खेळवलं नव्हतं.
हे वाचा : AI फीचर्ससह Motorola चा नवीन स्मार्टफोन बाजारात, किंमत तर केवळ इतकी
गुजरात टायटन्सने शुभमन गिलच्या 89 धावांच्या जोरावर 199 धावा केल्या होत्या. पंजाबच्या रबाडा आणि हर्षल पटेल यांनी चार षटकात प्रत्येकी ४४ धावा दिल्या. रबाडाने २ तर हर्षलने एक विकेट घेतली. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या पंजाबने 5 बाद 111 धावा केल्या होत्या. त्यावेळी शशांक सिंहने डावाची सूत्रे हातात घेतली.
त्याने 29 चेंडूत 61 धावा करत पंजाबला सामना जिंकून दिला. त्याला आशुतोष शर्मा याने चांगली साथ दिली. आशुतोषने 17 चेंडूत 31 धावा केल्या. पंजाब किंग्सने (IPL 2024) एक बॉल आणि 3 विकेट्स राखून गुजरात टायटन्सने विजयासाठी दिलेले आव्हान पूर्ण केले. गुजरात टायटन्सचा हा या सीझनमधील दुसरा पराभव ठरला तर पंजाब किंग्सने या सीझनमधील दुसरा विजय मिळवला.