Sunday, June 22, 2025

Bank charges : बँक तुमच्याकडून कसे पैसे घेते, तुम्हाला या चार्जबद्दल माहिती आहे का?

जर तुमच्या बँक खात्यात किमान बॅलन्स नसेल तर तुम्हाला दंड (Bank charges) आकारला जातो, हे तुम्हाला माहिती असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, गेल्या पाच वर्षांत सरकारी बँकांनी विविध दंडांमधून तब्बल ८,५०० कोटी रुपये कमावले आहेत.

तुमच्या बँक खात्यात किमान बॅलन्स ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खासगी बँकांमध्ये किमान बॅलन्स न ठेवल्यास ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. मात्र सरकारी बँकाही यात मागे नाहीत. सरकारी बँकांनीही गेल्या पाच वर्षांत विविध दंड आणि शुल्कांमधून (Bank charges) हजारो कोटी रुपये कमावले आहेत. पण बँका कोणकोणत्या प्रकारचे शुल्क वसूल करतात, हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर, याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

  1. सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान बॅलन्स न ठेवल्यास सरकारी बँका १०० ते २५० रुपयांपर्यंतचा दंड आकारतात. तर करंट अकाउंटमध्ये किमान बॅलन्स न ठेवल्यास ४०० ते ६०० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.
  2. कर्ज घेताना, अकाउंट उघडताना देखील बँका तुमच्याकडून डॉक्युमेंटेशन चार्ज वसूल करतात.
  3. बँक अकाउंट स्टेटमेंटची कॉपी घेतल्यास त्यासाठी देखील शुल्क आकारले जाऊ शकते.
  4. पेमेंटमध्ये डिफॉल्ट झाल्यास तुम्हाला बँकेला दंड भरावा लागतो.
  5. ओव्हरड्राफ्ट मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास शुल्क आकारले जाऊ शकते.
  6. कर्ज प्रकरणांमध्ये, बॅलन्स शीट सबमिट न करणं किंवा पेपर्स रिन्युअल न करणं यासाठी देखील दंड आकारला जातो.

एसबीआयवर टीका झाली होती देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयने विविध प्रकारच्या शुल्कांमधून पैसे (Bank charges) कमवल्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली होती. २०१९-२० पासून त्यांनी किमान बॅलन्स न ठेवल्याबद्दल आकारण्यात येणारे शुल्क बंद केले होते. मात्र, देशातील एकूण १२ सरकारी बँका अजूनही विविध प्रकारचे शुल्क वसूल करतात. त्यांनी गेल्या पाच वर्षांत यातून ८,५०० कोटी रुपये कमावले आहेत.

हे वाचा : L&T फायनान्स वैयक्तिक कर्ज: 7 लाख तातडीचे कर्ज उपलब्ध

लोकसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, विविध प्रकारचे दंड आकारून सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप पाच सरकारी बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, कॅनरा बँक, आणि बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. तर यादीत युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक अशा एकूण ११ सरकारी बँकांचा समावेश आहे.

काही बँका तिमाही आधारावर किमान बॅलन्स (Bank charges) न ठेवल्यास शुल्क आकारतात, तर काही मासिक आधारावर.तुम्हाला जर बँकेकडून आकारण्यात येणाऱ्या दंडापासून वाचायचं असेल, तर तुमच्या खात्यात किमान बॅलन्स नक्की ठेवा.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म