Saturday, June 21, 2025

Cleaning Hacks : फोन कव्हर कसे स्वच्छ करावे? जाणून घ्या अगदी सोपी पद्धत

मोबाईल फोनशिवाय जगण्याची काही जण कल्पना देखील करु शकत नाहीत. लोक फोनची खूप काळजी घेतात. सोबतच आपला फोन छान दिवावा म्हणून मोबाईल कव्हरही खरेदी करतात.

बहुतेक लोक हे पारदर्शक फोन कव्हर घेण्यास अधिक प्राधान्य देतात. पण यात अडचण अशी की काही दिवसांनी फोनचे कव्हर पिवळे पडते आणि घाण दिसू लागते. अशा स्थितीत फोन कव्हर कसे स्वच्छ (Cleaning) करावे हे जाणून घेऊया.
फोनचे मागील कव्हर स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय.

फोनचं कव्हर स्वच्छ ठेवणं देखील महत्त्वाचं आहे. जर तुमच्या फोनचा कव्हर खराब झाला असेल तर तुम्ही ते सहजपणे स्वच्छ (Cleaning) करू शकता आणि ते पुन्हा नवीन बनवू शकता. मोबाईलचे कव्हर साफ करण्यासाठी तुम्हाला दात स्वच्छ करणारा ब्रश आणि डिटर्जंटची आवश्यकता असेल.

– मोबाईलचे कव्हर स्वच्छ करण्यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी ठेवून मोबाईलचे कव्हर भिजवा.

– त्या पाण्याच्या भांड्यात डिटर्जंट मिसळवा.

– मोबाईलचे मागील कव्हर टूथब्रशने स्वच्छ (Cleaning) करा.

– मोबाईल कव्हर साफ केल्यानंतर, त्याच पाण्यात 15 मिनिटे ठेवून द्या.

– तीच प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. पुन्हा पुन्हा घासल्याने तुमच्या मोबाईलचे कव्हर साफ होईल.

टूथपेस्टने करा स्वच्छ

मोबाईलचे मागील कव्हर टूथपेस्टच्या मदतीने देखील स्वच्छ केले जाऊ शकते. असे केल्याने तुमच्या मोबाईलचे कव्हर चमकू लागेल.

मोबाईलचे मागील कव्हर स्वच्छ करण्यासाठी प्रथम एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात मोबाईलचे कव्हर ठेवा. यानंतर मोबाईलच्या कव्हरवर टूथपेस्ट लावा. आता टूथब्रशच्या मदतीने मोबाईलचे मागील कव्हर स्वच्छ करा.
पिवळे डाग जाईपर्यंत कव्हर स्वच्छ (Cleaning) करत रहा.

जर तुमच्या मोबाइल कव्हरचे ऑक्सिडीकरण झाले असेल, तर या उपायांमुळे मोबाइलच्या मागील कव्हरचा पिवळापणा दूर होणार नाही. यासाठी मोबाईलच्या मागील कव्हरपेक्षा जास्त महाग असलेले रसायन लागेल. अशा परिस्थितीत, बहुतेक लोकांना नवीन कव्हर घ्यावे लागेल.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म