चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याकडून गणेशभक्तांना मारहाण (Viral News) करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आला आहे. शनिवार रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात गणेशभक्त लालबाग परिसरात गणपतींचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहे.
अशातच चिंचपोकळी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गणेशभक्तांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.लालबाग, चिंचपोकळी भागात शनिवारी रात्री लाखो गणेशभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी गर्दी नियंत्रण करताना चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाविकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral News) झालाय.
चिंतामणी गणेशाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या बॅरिकेडला ढकलून शेकडो भाविकांचा लोंढा आत येत होता. त्यांना थांबवताना कार्यकर्त्यांचा संयम संपला आणि त्यांनी भाविकांना मारहाण करायला सुरूवात केली.
कार्यकर्त्यांनी काही भाविकांना अमानुष मारहाण केली. अक्षरशः लाथा बुक्क्यांनी भाविकांना मारहाण करण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये (Viral News) दिसत आहे. त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची ही दादागिरी वारंवार समोर येत आहे.रविवारी सुट्टी असल्याने मुंबईत लाखो गणेशभक्तांनी लालबाग परिसरात गर्दी केली आहे.
यावेळी गर्दी नियंत्रण करताना कार्यकर्त्यांकडून गणेशभक्तांना वारंवार अशी मारहाण करण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. हा असाच प्रकार काल रात्री चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून घडला.