cinema ‘बाहुबली’ स्टार प्रभासवर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन

साऊथ सिनेसृष्टीत (cinema) रिबेल स्टार म्हणून प्रसिद्ध असलेले उप्पलपती कृष्णम राजू यांचं यांचं निधन झालं. हैद्राबादमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ते 82वर्षांचे होते. ‘बाहुबली’ स्टार प्रभासचे ते काका होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. कृष्णम राजू यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली आहेत.
त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. कृष्णम राजू यांचा जन्म 20 जानेवारी 1940 मध्ये आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील मोगलथुर याठिकाणी झाला होता. त्यांनी आपल्या सिने करिअरमध्ये जवळजवळ 187 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी ‘चिलाका गोरिंका’ या चित्रपटाद्वारे मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं होतं.
कृष्णम राजू यांनी पदार्पणात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नंदी पुरस्कार पटकावला होता. त्यांना साऊथ इंडस्ट्रीमध्ये 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. तर 3 राज्य नंदी पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत.अभिनयानंतर कृष्णम राजू राजकारणात सक्रिय झाले होते.

त्यांनी 1990 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी काकीनाडा नरसापूरम या मतदार संघातून निवडणूक लढवली होती. आणि ते अनुक्रमे निवडूनदेखील आले होते. विशेष म्हणजे 1999 ते 2004 या कालावधीत त्यांनी तिसऱ्या वाजपेयी मंत्रालयात परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री पद भूषवलं होतं. परंतु 2009 मध्ये त्यांनी पक्षांतर केलं होतं.. चिरंजीवींनी स्थापन केलेल्या प्रजाराज्यम या पक्षात त्यांनी प्रवेश केला होता.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म