वाढत्या वजनामुळे प्रत्येक जण त्रस्त असतो. पण वजन वाढण्यामागे कारणं देखील वेगळी असतात. त्यातीत एक म्हणजे थायरॉइड. थायरॉईड ग्रंथी आपल्या मानेच्या मागच्या बाजूला असते. हे शरीरातील (LifeStyle Tips) मेटाबॉलिज्म नियंत्रित करते. परंतु जर या ग्रंथीमध्ये हायपो-थायरॉईडीझमची स्थिती आली तर व्यक्तीचे वजन वेगाने वाढू लागतं.
हे वाढलेलं वजन कमी करणं कठीण आहे, परंतु योग्य जीवनशैली आणि आहार घेऊन तुम्ही ते कमी करू शकता. त्यामुळे आज जाणून घेवू कोणत्या पदार्थांचं सेवन केल्यामुळे तुमचं वजन कमी होईल. जर तुम्हाला Thyroid मुळे वाढलेलं वजन कमी करायचे असेल तर अशा पदार्थांचा समावेश करा. ज्यामध्ये आयोडीन चांगल्या प्रमाणात आढळते. मीठ, मासे, अंडी या पदार्थांचं सेवन केल्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.
हे वाचा : डोळ्यांदेखत होत होते चिमुरडीचे अपहरण; प्रसंगावधान राखत असा उधळला डाव
फळे खाल्याने देखील होईल फायदा
फळं खाण्याचे अनेक फायदे आहेत, ते कोलेस्ट्रॉल (cholesterol) आणि मधुमेह कमी करण्यास मदत करतात. थायरॉईड रुग्णांनी सफरचंद, जांभुळ आणि एवोकॅडोचे सेवन करावे कारण त्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. एवढंच नाही तर, वाढलेल्या थायरॉईडमुळे शरीराला होणारे नुकसान देखील कमी करतात.
व्हिटॅमिन ‘डी’ अत्यंत महत्त्व
जर तुमच्या शरीरात (LifeStyle Tips) व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर त्यामुळे सूज येते आणि वजन वाढते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर सकाळी आणि संध्याकाळी उन्हात बसा. यासोबत तुम्ही अशा पदार्थांचं सेवन करा ज्यामध्ये व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात आढळेल. अंडी, मासे, ऑर्गन मीट आणि मशरूम यांमुळे शरीरातील व्हिटॅमिन डी कमतरता भासणार नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Smart India त्याची पुष्टी करत नाही.)