Tuesday, April 22, 2025

Bike Modification बाईक माॅडीफाय करण्यापूर्वी ‘हे’ नियम जाणून घ्या,नाहीतर भरावा लागेल दंड

जर तुम्हीही तुमची कार किंवा बाईक मॉडीफाय (Bike Modification) करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण कार मॉडीफाय करून घेण्याच्या प्रक्रियेत अनेकवेळा वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष होते. यामुळे तुम्हाला नंतर मोठे चलन भरावे लागू शकते. अकोला वाहतूक पोलीस अशा गाड्यांवर करडी नजर ठेवत असून बाईक माॅडीफाय करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

दिवसेंदिवस गाड्यांमध्ये माॅडीफिकेशन करून गाड्या मिरवण्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. मग यात दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचाही समावेश आहे. आपल्याला आवडेल असा रंग बदलणे, सायलेन्सरमध्ये बदल करणे, नंबर मध्ये नाव तयार होईल अशा नंबर प्लेट बनवणे, कर्णकर्कश असे हॉर्न बसवणे असे अनेक  प्रकार होत आहे. यात वाहतूक नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे. सत:च्या आनंदासाठी इतरांना नाहक त्रास दिला जात आहे.

कर्णकर्कश फटाके सारखे आवाज

18 लाख लोकसंख्या असलेल्या अकोला शहरात गाड्यांमध्ये बदल करून माॅडीफाय करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गाडीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फटाके सारखे आवाज काढले जातात. हे आवाज गाडी चालत असताना अचानक काढले जातात. त्यामुळे याचा त्रास इतर वाहनचालक, पादचारी तसेच रस्त्यालगत असलेल्या शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, कार्यालये यांना होतो.

हे वाचा ऋता दुर्गुळेने अशी केली करिअरला सुरुवात, जाणून घ्या तिचा प्रवास?

 दादा, मामा गाड्यांवर कारवाई

अकोला पोलिसांनी माॅडीफाय वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दादा, मामा, काका, पैलवान असे नंबरमध्ये नाव लिहिलेल्या गाड्या तसेच माॅडीफाय केलेल्या गाड्यांवर कारवाई केली जात आहे. गेल्या सहा महिन्यात 141 दुचाकींवर कारवाई करण्यात आली आहे.

मॉडीफाय (Bike Modification) वाहनांवर वाहतूक पोलीस करडी नजर ठेवून आहे. अशा वाहनांवर कलम 198 नुसार कारवाई केली जात आहे. यात 1000 रुपये दंड देखील आकारला जात आहे. गेल्या वर्षभरात 3 हजार अशा वाहनांवर कारवाई करण्यात आलेली असून 3 लाखांचा दंड वसूल केला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी दिली.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म