भरवशाचा गोलंदाज जसप्रित बुमराहची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे.कारण आशिया चषकात गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यानंतर बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली होती. दुखापतीतून सावरलेल्या बुमराहला त्या मालिकेत अधिक यश मिळालं नाही.
जसप्रीत बुमराहने त्याच्या इंन्स्टाग्रामला एक स्टोरी शेअर केली आहे.बुमराहची पुन्हा पाठ दुखू लागल्याने तो T20 विश्वचषकात खेळणार नसल्याचे जाहीर झाल्यापासून काही चाहत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
हे वाचा : मोठी दुर्घटना! खासगी बसने घेतला पेट; 10 जणांचा होरपळून मृत्यू
त्यामुळे तो संपातला असल्याचे त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून दिसून आले आहे.मागच्या काही दिवसांपासून आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे सगळ्या गोलंदाजांवर टीका होत आहे.
जसप्रीत बुमराहने त्याच्या इंन्स्टाग्रामला एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या मंझीलकडे जात असाल तर मध्येच थांबून तुम्ही भुंकणाऱ्या कुत्र्यांना दगड मारु नका. ही पोस्ट सद्या अधिक व्हायरल झाली आहे.