नुकत्याच झालेल्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोट बटण दाबून भारतात 5G इंटरनेट सेवा मोठ्या धूमधडाक्यात सुरू केली.तूर्तास 5G सेवा काही निवडक शहरांत सुरू झाली आहे; मात्र या सेवेशी संबंधित काही प्रश्न अनेकांच्या मनात आहेत.
यामधील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 5G साठी नवीन सिमकार्ड घ्यावं लागेल का? मात्र एअरटेलच्या 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना वेगळं सिम कार्ड खरेदी करण्याची गरज नाही. तसंच एअरटेलच्या 5G सेवेला तुमचा फोन सपोर्ट करेल की नाही, हेदेखील शाओमीचा फोन असलेले युझर्स अगदी सहज चेक करू शकतात.
एअरटेल 5G सेवा आठ शहरांमध्ये सुरू झाली आहे. त्यात दिल्ली, मुंबई, हैदराबाद, सिलिगुडी, नागपूर आणि वाराणसी आदी शहरांचा समावेश आहे; मात्र या शहरांमध्ये एअरटेलच्या 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी युझर्सना वेगळं सिम कार्ड खरेदी करण्याची गरज नाही. कंपनीने या सेवेला 5G Plus असं नाव दिलं असून, यामध्ये युझर्सना फक्त 5G सेवा मिळणार आहे.
विशेष म्हणजे, या शहरात एअरटेलचे ग्राहक त्यांच्या सध्याच्या सिम कार्डवरच 5G चा लाभ घेऊ शकतात. तसंच ग्राहक शाओमीच्या फोनमध्ये एअरटेल अॅप डाउनलोड करून, तो फोन एअरटेल 5G ला सपोर्ट करतो की नाही, हे स्वतः तपासू शकतात; मात्र यासाठी फोनला लोकेशन अॅक्सेस देणं गरजेचं आहे.
एअरटेलच्या 5G सेवेला सपोर्ट करणारे शाओमीचे स्मार्टफोन्स एअरटेलच्या 5G सेवेला सपोर्ट करणाऱ्या शाओमीच्या स्मार्टफोन्समध्ये शाओमी 11 आय हायपर चार्ज, शाओमी रेडमी नोट 10 टी, शाओमी रेडमी नोट 11 प्रो प्लस, पोको एम 4 – 5G, पोको एम 4 प्रो 5G, शाओमी 12 प्रो, शाओमी 11 आय, शाओमी एमआय 11 अल्ट्रा, शाओमी एमआय 11 एक्स प्रो, शाओमी एमआय 10 टी प्रो.
शाओमी एमआय 11 एक्स, पोको एम 3 प्रो 5G, पोको एफ 3 जीटी, शाओमी एमआय 11, शाओमी एम आय 11 लाइट एनए, शाओमी रेडमी नोट 11 टी 5G यांचा समावेश आहे. दरम्यान, तुमच्या शहरात एअरटेलची 5G सेवा सुरू झाली असेल आणि तुमच्याकडे शाओमीचा कंपनीचा फोन असेल, तर तुम्ही तुमचा फोन 5G सेवेला सपोर्ट करतो की नाही, हे अगदी सहज तपासू शकता.