नुकतीच आई झालेली अभिनेत्री (Actress ) काजल अग्रवाल आपल्या तान्ह्या बाळासह एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे आणि तिनं आपल्या बाळाची झलकही दाखवली आहे.अभिनेत्री शुक्रवारी पती गौतम किचलू आणि आपला लहान मुलगा नीलसोबत ती मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली.
अनेकदा काजल आपल्या मुलाचे फोटो इन्टाग्रामवर (Instagram) पोस्ट करत असते आणि पण तिच्या बाळाचा चेहरा नेहमीच लपवते. त्यामुळे चाहत्यांना तिच्या बाळाचे दर्शन काही होत नाही परंतु नुकत्याच व्हायरल झालेल्या या फोटोंमधून काजलच्या बाळाचा गोंडस चेहरा तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.हा फोटो सध्या सगळीकडेच चर्चा सगळीकडेच होते आहे. या फोटोत नील शांतपणे झोपलेला दिसतो आहे.
हे वाचा :- पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस (rain), महाराष्ट्रासह देशभरातील 17 राज्यांमध्ये पावसाचा इशारा
आई झाल्यानंतर काजल (Actress) कमल हसनसोबत इंडियन 2 या चित्रपटात काम करत आहे. अशी बातमी समोर आली आहे की या चित्रपटासाठी तिनं घोडेस्वारी, तलवारबाजी आणि कलारीपयट्टूचा सराव केला आहे. नुकताच काजलने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.
यामध्ये ती जिममध्ये तिच्या प्रशिक्षकांसोबत कलारीपयट्टूचा सराव करताना दिसते आहे. व्हिडिओमध्ये काजलने काळ्या रंगाचा टँक टॉप घातला आहे. काठी मारणे, तलवारबाजी यासोबतच ती तिच्या कलारीपायट्टू ट्रेनरसाठी स्ट्रेचिंग आणि कॉम्बॅट ट्रेनिंग करताना दिसत आहे.