Monday, April 21, 2025

Petrol-Diesel दिवाळीआधी ग्राहकाना मोठा धक्का,राज्यात पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग

रुपया नीचांकी पातळीवर जात आहे तर डॉलरचं मूल्य वाढल्याने त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Petrol-Diesel) किमतीत गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल होत आहेत. मंगळवारी ब्रेंट क्रूडची किंमत जागतिक बाजारात 95.60 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरली आहे. तर WTI प्रति बॅरल $90.62 वर पोहोचली आहे.

या किमती गेल्या महिन्यापेक्षा जास्त आहेत. याच पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेल कंपन्यांनी आज इंधनाचे नवे दर जाहीर केले आहेत. चांगली गोष्ट म्हणजे देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये किमतीत कोणताही बदल झाला नाही.

हरियाणामध्ये पेट्रोल 0.23 रुपयांनी वाढून 97.52 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 0.22 रुपयांनी वाढून 90.36 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं. हिमाचलमध्ये 0.68 रुपयांनी पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ झाली. तर डिझेल प्रति लिटरमागे 0.58 रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात 50 पैशांची वाढ झाली आहे. याशिवाय पंजाब आणि राजस्थानमध्ये किमतीत किंचित वाढ झाली आहे.

प्रमुख चार महानगरांमध्ये कसे आहेत दर?

चार प्रमुख महानगरांमध्ये कोणताही बदल झाला नाही. या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे (Petrol-Diesel) दर बदलतात आणि बदलेले दर सकाळी जारी केले जातात. यावर एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन, वॅट आणि इतर टॅक्स लावल्याने त्याची किंमत वाढते. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल डिझेल चढ्या दरात मिळतं. ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा पेट्रोल डिझेल वाढणार का याची भीती देखील आहेच.

पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

काही दिवसांपूर्वी CNG आणि PNG च्या दरात वाढ करण्यात आली. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. हे दर वाढल्यामुळे टॅक्सी आणि रिक्षानेही काही शहरांमध्ये भाडेवाढ केली आहे. सणासुदीच्या तोंडावर महागाई वाढत असल्याने आता सर्वसामान्य चिंतेत आहेत.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म