दहशतवादी कश्मीर खोऱयात हिंदूंची शोधून शोधून हत्या करत आहेत. खोऱयात हिंदू सुरक्षित (Safe) नाहीत. मी सर्व हिंदूंना आवाहन करते की, जगायचे असेल तर खोरे सोडून पळा. दहशतवादी माझ्या भावाप्रमाणे सर्व हिंदूंची हत्या करतील, अशी भीती शनिवारी हत्याकांड करण्यात आलेल्या पूरन कृष्ण भट यांच्या बहिणीने व्यक्त केली आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट किलिंग सुरू केले असून शोपिया जिह्यात शनिवारी पूरन कृष्ण भट या कश्मिरी पंडिताची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. शोपिया जिह्यातील चौधरी गुंड भागात भट हे शनिवारी त्यांच्या सफरचंदच्या बागेत जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या.
रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हत्येच्या काही तासांनंतर कश्मीर फ्रिडम फायटर्स या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर यापुढे अशा प्रकारे हिंदूंना टार्गेट करून हल्ले करू, अशी धमकीही दिली आहे.
भट यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भट यांच्या बहिणीने कश्मीर खोऱयात हिंदू सुरक्षित (Safe) नसल्याची भीती बोलून दाखवली.मी शुक्रवारी भावाशी बोलले. त्याला असुरक्षित वाटत होते. आम्ही त्याला खोरे सोडून निघून ये, असे सांगितले.
हे वाचा : चहासोबत ‘या’ 6 गोष्टी पदार्थ घातक, होईल वाईट परिणाम.
मात्र, मुलांच्या संगोपणासाठी मला पैशाची गरज आहे. त्यांच्या संगोपणासाठी, चांगल्या शिक्षणासाठी व्यवस्था करायची आहे, असे त्याने सांगितले. मात्र, दहशतवाद्यांनी डाव साधत त्यांची हत्या केली, असे भट यांच्या बहिणीने सांगितले. या हत्याकांडामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.