ओव्हरटेकच्या (Overtake) नादात बस आणि ट्रकचा बडोद्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गुजरातमधील बडोद्याजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून ही बस राजस्थानमधील भीलवाडा इथं जात होती.
भरधाव बस बडोद्याजवळ पोहोचली असता ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले णि ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात बसचे मोठे नुकसान झाले आहे. बसच्या ड्रायव्हरच्या बाजूचा भाग पूर्णपणे कापला गेलाा आहे. स्लीपर कोच ही बस होती.
या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहे. काही जखमींना सयाजी रुग्णालयात दाखल केले आहे.दरम्यान, महाराष्ट्रात दोन अपघाताच्या (Overtake) घटना समोर आल्या आहे. चंद्रपूरहन आष्टीकडे भरधाव वेगाने येणारी स्कार्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरील कठडे तोडून वैनगंगेच्या नदीपात्रात कोसळल्याने चालकाचा मृत्यू झालाय. वैनंगगा नदीला भरपूर पाणी आहे.
त्यामुळे कार न कोसळल्यानंतर पाण्यात पुर्णपणे बुडाले होते. या अपघातीतील मृतक चालकाची अद्याप ओळख पटलेली नाही. दरम्यान अपघातानंतर दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.तर, पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वेवर खोपोली एक्झिटजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक मुंबई लेनवरून थेट पुणे लेनवर गेला त्याच वेळेस मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या टँकरला धडकून उलटला. हा अपघात पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडला. यात कोणतीच जीवितहानी नाही.
मात्र या अपघाताने (Overtake) पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त एक लेन बंद करून काही काळ तातडीने पुण्याकडे जाणाऱ्या दोन मार्गिका सुरू केल्या होत्या,तरी घाट क्षेत्रातील वाहतूक पूर्व पदावर येण्यास काही वेळ लागण्याची शक्यता? हा अपघात घडल्यानंतर ट्रक चालक पळून गेला. टँकरला बसलेल्या धडकेने ऑइल रस्त्यावर सांडले होते.