Wednesday, April 23, 2025

Political : राज ठाकरे यांचं आता मुंबईकरांना पत्र, म्हणाले, शिंदे आणि फडणवीस.

महाराष्ट्राचं लक्ष आज छ. शिवाजी पार्कवरील दीपोत्सवाकडे लागलंय. (Political) मनसेच्या दीपोत्सवासाठी राज ठाकरेयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना आमंत्रित केलंय. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावेळी मनसे आणि भाजपची युती होणार, अशा चर्चांना उधाण आलंय. त्यातच दीपोत्सवासाठी मुंबईकर आणि दादरवासियांना राज ठाकरे यांनी आवाहन केलंय.

राज ठाकरे यांनी दादरकरांच्या नावाने एक पत्र लिहिलंय, मनसेच्या दीपोत्सवाला शिवाजी पार्क वरील शेजाऱ्यांनी, समस्त दादरकरांनी उपस्थित रहावं, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे. 21 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर असा दीपोत्सव मनसे साजरा करणार आहे.

यावेळी मुंबईकरांनीही आमच्या आनंदात सहभागी व्हावं. प्रत्येकाने दिवे लावून, आपल्या अंगणात रोषणाई करून परिसर उजळून टाकावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय. तसंच आज या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला (Political) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला तुम्ही सर्वजण मित्र-मंडळी, आप्त स्वकियांसोबत उपस्थित रहावे, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.

हे वाचा : 5G आल्यानंतरही 4G प्लानसाठी ग्राहकांच्या उड्या, फायदे जाणून तुम्ही कराल रिचार्ज

राज ठाकरे यांचं पत्र- जशास तसं….

21 ऑक्टोबर, 2022 माझ्या शिवाजीपार्क शेजाऱ्यांनो तसेच समस्त दादरकर आणि मुंबईकर जनहो,

दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. गेली काही वर्ष करोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती, परंतु यावेळेस दिवाळीच्या निमित्ताने वातावरणात पुन्हा उत्साह, आनंद दिसतोय. दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई, म्हणजेच ‘दीपोत्सव’ हे गेल्या 10 वर्षांपासून जणू समीकरणच बनलं आहे.

दरवर्षी आपण शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करतो. कोरोनाच्या 2 वर्षांत सुध्दा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या दीपोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे. दीपावलीच्या निमित्ताने आपण आपलं घर, आपलं अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळवून टाकतो.

दादर मधील हा शिवतीर्थाचा परिसर, हे मी माझ्या घराचं अंगणच समजतो, म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं विविध रंगी लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईनं आणि इतर सजावटीनं आपण उजळवून टाकणार आहोत. मला तर वाटतं की प्रत्येकानं आपल्या घराबरोबर आपलं अंगण आणि आपला परिसर असाच सुंदर ठेवला तर महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा होईल.

हे करण्यामागेही माझी तीच भावना आहे. वसुबारसेपासून, 21 ऑक्टोबर 2022 पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत,  8 नोव्हेबंर 2022 पर्यंत, हा दीपोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी वसुबारसेला म्हणजे 21 ऑक्टोबरला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत.

आपण अवश्य यावे, आपल्या कुटुंबातील सर्वांना घेऊन या. मित्र मंडळींना सांगा. आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा.  आपल्या सर्वांचा, राज ठाकरे

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म