बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Actress) आणि हुमा कुरेशी आपल्या आगामी ‘डबल एक्सएल’ या चित्रपटामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहेत.या दोघीही आपल्या संपूर्ण टीमसह प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या प्रमोशनदरम्यान कलाकार अनेक रंजक किस्से शेअर करत आहेत.
तसेच सेटवरील अनेक मजेशीर गोष्टी उघड करत आहेत. एका मुलाखतीदरम्यान हुमा कुरेशीने खुलासा केला की, लंडनमध्ये ‘डबल एक्सएल’च्या संपूर्ण कलाकारांसह तिला क्वारंटाईन ठेवताना सोनाक्षी सिन्हाचा फोन हरवण्याची भीती तिला वाटत होती.
संपूर्ण घटना सांगताना आणि तिच्या भीतीबद्दल बोलताना हुमा म्हणाली, ‘आम्ही जेव्हा चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलो होतो तेव्हाही कोरोना महामारी सुरु होती.प्रोटोकॉलनुसार आम्हाला लंडनमध्ये 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहायचं होतं. याबाबत बोलताना अभिनेत्री हुमा पुढे म्हणते की, ‘यासाठी आम्ही एकत्र आयसोलेट झालो होतो.
पहिले 1-2 दिवस आम्ही एकमेकांचा खूप आदर करायचो आणि एकमेकांशी चांगले वागत होतो. आम्ही तिघे (सोनाक्षी, हुमा आणि झहीर) आधीपासूनच चांगले मित्र होतो आणि मनत (राघवेंद्र) नवीन होते.पण आम्ही 14 दिवस एकत्र सर्वकाही मिळून एकत्र करत असल्याने, एक चांगलं बॉन्डिंग तयार झालं होतं.
हुमा कुरेशी, सोनाक्षी सिन्हा (Actress), झहीर इक्बाल, मनत राघवेंद्र आणि दिग्दर्शक सतराम रमानी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये त्यांच्या ‘डबल एक्सएल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. हा चित्रपट हुमा आणि सोनाक्षीवर अवलंबून आहे. या शोमध्ये हुमाने सोनाक्षीच्या फोनबाबत एक अनोखा खुलासा केला आहे.
यावेळी शोमध्ये संवाद साधताना हुमाने आपल्या सेटवरील विविध आठवणींना उजाळा दिला. हे चौघे वेगवेगळे गेम कसे खेळायचे, मालिका पाहायचे आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायचे आणि फोटो क्लिक करायचे हे हुमाने आठवले. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ फेम या अभिनेत्रीने (Actress) एकदा सोनाक्षीला सांगितले होते की तिचा फोन हरवला तर ती अधिक काळजीत पडेल कारण तिचा फोनवरील सर्व डेटा हरवला आहे. ‘द कपिल शर्मा शो’ शनिवार-रविवारी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो.
या बहुचर्चित चित्रपटातून भारतीय क्रिकेटर शिखर धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. परंतु या चित्रपटात शिखर धवन मुख्य अभिनेता म्हणून झळकणार नाहीये. तर तो एका महत्वाच्या भूमिकेत गेस्ट अपिरिअन्स करणार आहे. सध्या शिखरचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
हुमासोबतच शिखरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या चित्रपटाची संपूर्ण स्टोरी समोर आलेली नसली तरी या चित्रपटाचा विषय सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांच्या वजनदार या मराठी चित्रपटाला मिळता जुळता आहे.
या चित्रपटात वाढत्या वजनामुळे त्रस्त लोकांच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. ‘डबल एक्सएल’ चे दिग्दर्शक सतराम रमाणी यांनी हा दैनंदिन आयुष्यातील मुद्दा फारच वेगळ्या आणि नव्या अंदाजात सादर केला आहे. या चित्रपटात हुमा कुरैशी आणि सोनाक्षी सिन्हासोबत (Actress) अभिनेता झहीर इकबाल आणि मनीत राघवेंद्र दिसणार आहेत. सोबतच या चित्रपटात भारतीय क्रिकेटर शिखर धवन गेस्ट अपीरिअन्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा टीजर समोर आल्या पासून शिखर धवनचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.