Monday, April 21, 2025

बँक खात्यातून क्षणात गायब होतील पैसे; आताच Delete करा ‘हे’ Apps

स्मार्टफोन (Snartphone) हातात आल्यापासून अनेक गोष्टी, किंबहुना अनेक व्यवहार अधिक सोपे आणि सहज झाले. पण, यामध्ये अशी एक समस्या उदभवली, ज्यामुळे आपल्या Savings अर्थात बँक खात्यात असणाऱ्या पैशांवर गदा आली. मोबाईल, इंटरनेट  आणि तत्सम सुविधांच्या उपलब्धतेमुळे सायबर सिक्युरिटी धोक्यात आली.

त्यामुळं आता मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही नोटीफिकेशनवर क्लिक करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार केला जाणं तितकंच महत्त्वाचं ठरू लागलं आहे. ऑनलाईन पेमेंट , नेट बँकींगमुळे आपणच आपल्या खात्यातील पैसे धोक्यात आणत आहोत. कारण, या सर्व व्यवहारांवर हॅकर्सचीही नजर आहे. तेव्हा बँक खातं नेमकं सुरक्षित कसं ठेवायचं, हे जाणूनच घ्या.

काही दिवसांपूर्वीच गुगलने प्ले स्टोअरवरून  काही अॅप्स डिलीट केले. युजर्सची खासगी माहिती लीक केल्याचा आरोप या Apps वर लावण्यात आला होता.  Meta  नं केलेल्या दाव्यानुसार साधारण 10 लाख युजर्सनी असे अॅप्स डाऊनलोड केले होते, ज्यामुळे त्यांची खासगी माहिती लीक झाली होती. यामध्ये बँक खात्यासंदर्भातील माहितीचाही समावेश होता.

हे वाचा : कसा असेल तुमचा आजचा दिवस. जाणून घ्या राशीफलच्या माध्यमातून दि : 31-10-2022

Android Users ना अशा अॅप्सपासून सावध राहणं सहज शक्य होतं. कारण त्यांना असे काही सॉफ्टवेअर मिळतात जे मालवेअर हटवतात. ही बाब टेक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी चिंता वाढवताना दिसत आहे. धोकादायक अॅप्सपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी Optimizing आणि Cleaning अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात.  Super Clean, Rocket Cleaner हे त्यासाठीचे उत्तम पर्याय.

मोबाईलवर कोणतंही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती मिळवा. secure नसणारे अॅप्स डिलीट करा. त्यांचे रेटिंग्ज आणि रिव्ह्यू पाहा. अॅप सुरक्षित आहे का, यावर लक्ष द्या. अनावधानाने आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि हीच बाब पुढे आपल्यावर पश्चातापाची वेळ आणते. असं होऊ देऊ नका.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म