T20 वर्ल्डकपमध्ये रविवारी झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये टीम इंडियाच्या विजय घोडदौडला ब्रेक लागला. या दारुण पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्माच्या काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातं आहे.
कारण T20 वर्ल्डकप क्रमतालिकेत टीम इंडिया घसरली आहेत. भारताला 3 मॅचसाठी 4 गुण मिळाले आहेत. तर दक्षिण आफ्रिका 3 मॅचसाठी 5 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे रोहित शर्माला पुढील मॅचसाठी रणनिती आखावी लागेल आणि त्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागलीत.
रोहित शर्मा या खेळाडूच्या कामगिरीवर नाराज असून तो त्याबद्दल काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टीम इंडियाची बॅटिंग आणि फिल्डिंगमुळे पराभवनाची नामुष्की ओढवली. क्रिकेटप्रेमींची रविवारी टीम इंडियाकडून निराशा पदरी पडली. दक्षिण आफ्रिकाविरुद्धात पहिल्यांदा बॅटिंग करुन टीम इंडियाने 9 गडी गमावून 133 धावांचं लक्ष्य दिलं.
सूर्यकुमार यादवने 170 च्या स्ट्राईक रेटने खेळताना 40 चेंडूत 68 धावा केल्या. त्याने 6 चौके आणि 3 सिक्सर लगावले. लुंगी एन्गिडीने 4 विकेट घेऊन त्याला सामनावीरचा सन्मान मिळाला. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने दोन गडी बाद केले. तरदुसरीकडे रविवारच्या मॅचमध्ये टीम इंडियाची फिल्डिंग कमजोर होती, अशी खंत रोहित शर्माने व्यक्त केली.
T20 टीम इंडियाचा स्टार सलामीवीर केएल राहुल पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यापासून त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते पण संघ व्यवस्थापनाने त्याला साथ दिली. या सामन्यापूर्वी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनीही सध्या सलामीच्या जोडीमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितले होते.
हे वाचा : समंथाच्या आजाराविषयी माहिती मिळताच चिरंजीवी यांची खास पोस्ट
राहुलला गेल्या 3 सामन्यात केवळ 22 धावा करता आल्या आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध 4, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9-9 धावा केल्या. अशा परिस्थितीत आगामी सामन्यांमध्ये राहुलला संधी मिळणार की रोहितला संघातून वगळण्यासाठी मोठे पाऊल उचलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मूळचा कर्नाटकचा असलेल्या केएल राहुलने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 69 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 2 शतके आणि 20 अर्धशतकांसह एकूण 2159 धावा केल्या. त्याने कसोटीत 2547 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 1665 धावा केल्या आहेत.