आज देशांतर्गत शेअर (stock market) बाजारासाठी जागतिक संकेत अधिक चांगले दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये खरेदी दिसून येत आहे. तर शुक्रवारी अमेरिकन बाजारातही तेजी दिसून आली. शुक्रवारी डाऊ जोन्स ८२९ अंकांनी किंवा २.५९ टक्क्यांनी वाढून ३२,८६१.८० च्या पातळीवर तर नॅसडॅक २.८७ टक्क्यांनी मजबूत होता आणि ११,१०२.४५ च्या पातळीवर बंद झाला.
तसेच S&P ५०० निर्देशांक २.४६ टक्क्यांनी वाढून ३,९०१.०६ वर बंद झाला.आज शेअर बाजाराची सुरुवात चांगल्या गतीने झाली आहे, ज्यामध्ये बीएसई निर्देशांक सेन्सेक्स २८७.११ अंकांच्या किंवा ०.४८ टक्क्यांच्या उसळीसह ६०,२४६.९६ वर उघडला आहे. तसेच एनएसईचा शेअर्सचा निर्देशांक निफ्टी १२३.४० अंकांच्या किंवा ०.६९ टक्क्यांच्या वाढीसह १७,९१०.२० वर उघडला.
आज, बाजाराच्या पूर्व सुरुवातीच्या काळात बीएसई सेन्सेक्स २१५ अंकांच्या किंवा ०.२६ टक्क्यांच्या वाढीसह ६०,१७५ च्या स्तरावर व्यवहार करत होता. दुसरीकडे, एनएसईचा निफ्टी १०५ अंकांच्या किंवा ०.५९ टक्क्यांच्या उसळीसह १७,८९२ च्या पातळीवर दिसला. बाजाराच्या प्री-ओपनिंग सिग्नल्सवरून शेअर बाजाराची (stock market) आजची सुरुवात दमदार असल्याची कल्पना आली होती.
आज सेन्सेक्समधील ३० पैकी २८ समभाग उसळी घेऊन व्यवहार करत आहेत आणि केवळ NTPC चा टाटा स्टीलचा समभाग घसरणीच्या लाल चिन्हात आहे. उर्वरित २८ स्टॉक्स हिरव्या रंगात आहेत. दुसरीकडे, निफ्टीमधील ५० पैकी ४७ समभाग उसळी घेऊन व्यवहार करत आहेत. इथेही फक्त एनटीपीसी, टाटा स्टील आणि UPL मध्ये घसरण होत आहे आणि बाकीचे शेअर्स (stock market) वधारत आहेत.
सेन्सेक्समधील जवळपास सर्व समभाग तेजीत व्यवहार करताना आहेत. टेक महिंद्रा, मारुती, इन्फोसिस २% पेक्षा जास्त वाढीसह व्यवहार करत असून टाटा स्टील आणि एनटीपीसी किरकोळ घसरले. तर दुसरीकडे निफ्टीचे फार्मा, आयटी आणि ऑटो निर्देशांक १% पेक्षा जास्त वाढले आहेत.
आज तीन निफ्टी कंपन्या भारती एअरटेल, L&T आणि टाटा स्टील यांचे त्रैमासिक निकाल जाहीर करतील, ज्यांच्यावर बाजाराचे लक्ष असेल. दुसरीकडे, एफआयआयने शुक्रवारी १५६९ कोटींची रोख खरेदी केली, तर डीआयआयने ६१३ कोटींची विक्री केली.