तारकर्ली समुद्री किनारपट्टीवर पर्यटकांचा (Tourism) बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून बंदर विभागाने एम टी डी सी समोरील चारशे मिटर किनारा परिसर पर्यटकांसाठी प्रतिबंधित करून त्याठिकाणी लाल झेंडे लावले. दरम्यान, या प्रश्नी पर्यटन व्यवसायिक आक्रमक बनले.
तात्काळ झेंडे हटविण्यात यावेत. किनारपट्टीवर सुरक्षेच्या उपाययोजना न करता केवळ किनारपट्टी प्रतिबंधित करण्याचे काम बंदर विभाग कोणत्या अधिकारात करते यासह अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. दरम्यान, पर्यटन व्यवसायिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांनी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ यांच्याशी चर्चा करून झेंडे हटविण्याचे आदेश दिले.
त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. मालवण तालुक्यातील पर्यटन व्यवसायिकांच्या विविध समस्या प्रश्नी पर्यटन (Tourism) महासंघाच्या मागणी नुसार मालवण तहसीलदार येथे गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील विविध प्रशासन प्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, शेखर गाड, अवी सामंत, अन्वेशा आचरेकर, दादा वेंगुर्लेकर, सहदेव साळगावकर, आर्या मयेकर, मंगेश जावकर, रामा चोपडेकर यासह पर्यटन व्यवसायिक उपस्थित होते.
या बैठकीत वाहतूक कोंडीची समस्या, किनारपट्टी अस्वच्छता, सतत खंडीत होणारा व कमी दाबाचा विज पुरवठा यासह अन्य प्रश्नी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. पर्यटन (Tourism) व्यवसाया संबंधी अन्य विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
यावर्षीच्या मे महिन्यात काही मुंबई-पुणे येथील पर्यटक (Tourism) सकाळी स्कुबा डायव्हिंगला गेलेले असताना मालवणमधल्या तारकर्ली येथे आलेले. परंतु डायव्हिंग करून बोटीनं परतत असताना त्यांची बोट बुडाली आणि त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यानं दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला तर 16 जणांना वाचविण्यात यश आले होते. पण यातील दोन जणांची प्रकृती गंभीर होती. बोट बुडत असल्याचं लक्षात येताच तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं.
स्थानिकांनीही बचाकार्यात मोठी मदत केलीहोती त्यामुळे 16 पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश आले होते. परंतु या घटना वारंवार तेथे घडतं आहेत आणि त्यामुळे लोकांच्या काळजीसाठी हा परिसर आता बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक तारकर्ली इथं स्कुबा डायव्हिंगसाठी येतात.