जान्हवी कपूरचा मिली हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चित्रपटाच्या (Entertainment) प्रमोशनमध्ये जान्हवीने अजिबात कसर सोडली नाहीये. द कपिल शर्मा शो, बिग बाॅस अशा शोमध्ये जात जान्हवीने चित्रपटाने प्रमोशन केले आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही सक्रिय होत, जान्हवी प्रमोशन करत आहे.
आज फक्त जान्हवीचाच नाही तर कतरिना कैफ आणि सोनाक्षी सिन्हा यांचे देखील चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. मात्र, बाॅक्स आॅफिसवर कोणता चित्रपट हीट ठरतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.चित्रपट रिलीज झाल्यावर लगेचच जान्हवी कपूर चर्चेत आलीये.
हे वाचा : कोकणातील ‘हा’ निसर्गरम्य किनारा पर्यटनासाठी बंद?
मात्र, तिच्या मिली चित्रपटासाठी (Entertainment) ती चर्चेत आली नसून थोड्या वेगळ्या कारणासाठी जान्हवी चर्चेत आहे. मिली चित्रपटाची निर्मिती जान्हवीच्या वडिलांनी म्हणजेच बोनी कपूर यांनी केलीये. हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक असून यामध्ये जान्हवीने जबरदस्त भूमिका केलीये.
मिली हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर चांगले कलेक्शन करेल किंवा नाही, हा थोडा वेगळा विषय आहे. मात्र, त्यापूर्वीच जान्हवीचे नशीब उजळले आहे. जान्हवी कपूरने मुंबईतील वांद्रे परिसरात डुप्लेक्स बंगला खरेदी केला आहे. Indextap.com च्या रिपोर्टनुसार, जान्हवीचा हा बंगला 6421 स्क्वेअर फूट कार्पेट एरियासह 8669 स्क्वेअर फूटचा आहे.
जान्हवी कपूरला या बंगल्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागलीये. जान्हवीने फक्त नोंदणीसाठी 3.90 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. जान्हवीने हा बंगला तब्बल 64 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. द कपिल शर्मा शोमध्ये जान्हवी कपूरसोबत बोनी कपूरही शोमध्ये आले होते. यावेळी बोनी कपूर यांनी जान्हवीचे अनेक राज सांगितले.