Tuesday, April 22, 2025

Amazon कडून युजर्सना फुकटात मिळतंय ‘या’ App चं प्रिमीयम सब्सक्रिप्शन

Amazon हे एक असं अॅप आहे जे जवळपास दर दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळतं. लहानातल्या लहान वस्तूपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी किंवा उपकरणापर्यंत बऱ्याच गोष्टी या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला खरेदी करता येऊ शकतात . इतकंच काय, तर अॅपच्या मदतीनं तुम्ही पैसे, बिलं या साऱ्यांची देवाणघेवाणही करु शकता.

भेटवस्तू पाठवू शकता. अशा या बहुविध वापराच्या App कडून एक धमाकेदार ऑफर तुमच्या भेटीला आली आहे. सहा महिन्यांसाठी आता अॅमेझॉन तुम्हाला स्पॉटीफाय Spotify चं प्रिमियम सब्सक्रिप्शन  अगदी मोफत मिळवून देणार आहे. ही ऑफर निवडक खरेदीदारांसाठी उपलब्ध असेल.

हे वाचा : जान्हवी कपूर’ला लागली लॉटरी,तब्बल इतक्या कोटींचा बंगला खरेदी

तुम्हाला इतकंच करायचं, की Amazon सुरु करून यासाठी स्वत:ला पात्र ठरवाचं आहे. अॅमेझॉनकडून यासंदर्भातील माहिती त्यांच्या सपोर्ट पेजवर देण्यात आली आहे. जिथं ज्या युजर्सचा ई-मेल आयडी  अॅमेझॉन इंडियाकडे registered आहे त्यांच्यासाठीच ही ऑफर असेल.

ऑफरच्या उपलब्ध माहितीनुसार जे युजर्स laptops, tablets, mobile devices आणि इतर उपकरणं जसंकी headphones आणि speakers ज्यांची किंमत 1 हजारहून जास्त आणि 5 हजार किंवा त्याहून कमी असेल तर त्यांच्यासाठी स्पॉटीफायचं 3 महिन्यांचं प्रिमियम सब्सक्रिप्शन असेल. थोडक्यात तुम्हाला 6 नाहीतर 3 महिन्यांचं सब्सक्रिप्शन मिळेलच.

अॅमेझॉनकडून देण्यात आलेल्या या धमाकेदार ऑफरची अंतिम तारीख आहे 24 नोब्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022. जे या ऑफरसाठी पात्र ठरतील त्यांच्या रजिस्टर्ड ईमेलवर त्यासंबंधीचं voucher येणार आहे. 15 डिसेंबर 2022 पर्यंत हे voucher येईल असं टीम अॅमेझॉनकडून सांगण्यात आलं आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म