जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आज पुन्हा एकदा वाढ झाली असून ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 98.57 डॉलरवर पोहोचले आहे. देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे (petrol diesel) दर गेल्या पाच महिन्यांपासून त्याच पातळीवर सुरू आहेत. दरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.
अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आले आहे. मात्र असेल असले तरी, देशातील 4 महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर महाराष्ट्रातपेट्रोलचा दर 0.32 रुपयांनी तर डिझेलचेदर 0.33 रुपयांनी कमी झाला आहे.
हे वाचा : winter vibes राज्यात थंडीचा तडाखा वाढला.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला म्हणजे 1 नोव्हेंबरला अनेक पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel) दरात प्रतिलिटर 40 पैशांनी कपात होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र नंतर त्याची अंमलबजावणी झाली नाही. सोमवारी सकाळी WTI क्रूड 1.69 डॉलरने घसरून 90.92 डॉलर प्रति बॅरलवर आले. ब्रेंट क्रूडमध्येही घसरण झाली आणि ते प्रति बॅरल $ 97.09 पर्यंत घसरले. ओपेक देशांनी उत्पादनात कपात केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या किमती वाढल्या आहेत.
शहर आणि तेलाच्या किमती
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74४ रुपये प्रति लिटर
सरकारी मालकीच्या तेल कंपन्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड , इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारित दररोज तेलाच्या (petrol diesel) किमती जारी करतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास त्याची अंमलबजावणी सकाळी 6 वाजल्यापासून केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यास, राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखे राहत नाहीत.
तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे (petrol diesel) दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.