धुळ्यातील एका बस चालकाने धक्कादायक पाऊल उचललल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान धुळे ते गुजरात बस चालकाने प्रवास केला गाडी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानकात लावली. अन् अचानक चालकाने थांबलेल्या बसमध्ये मध्यभागी असलेल्या नळीला दोरी बांधत गळफस (Crime) घेतल्याने सगळ्यानाच धक्का बसला आहे.
धुळ्यातील बसचालकाने गुजरातमध्ये आत्महत्या का केली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. नवीन पाटील असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत.काल (दि.12) काही तासांचा प्रवास करत नवीन पाटील या बसचालकाने धुळे ते गुजरातमधील सुरत एसटी प्रवास केला.
दरम्यान बस मध्यरात्री सुरतच्या उधना बस स्थानकात जाताच कोणी नसल्याचा अंदाज घेत. बसमध्ये दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या (Crime) केली. दरम्यान काही काळाने आत्महत्या केल्याचे समजताच बस स्थानकात एकच खळबळ उडाली होती.
ही घटना काल मध्यरात्रीची घडली असून आज सकाळी निदर्शनास आली आहे. या घटनेनंतर गुजरात परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सदर चालकाचा मृतदेहाचा पोस्टमार्टम करून कायदेशीर प्रक्रियेनंतर धुळ्याला पाठवण्यात येणार आहे. दरम्यान चालक पाटील यांनी आत्महत्या (Crime) का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
महाराष्ट्रात लाल परीचे चाक पुन्हा रुळावर आले असले तरी संपामुळे अनेक कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. कर्जाचे हफ्ते, आर्थिक विवंचनेत सापडल्याने नवीन पाटील यांनी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.पाचोरा-जळगाव रस्त्यावर असलेल्या बिल्दी धरणाजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागी ठार झाला.
तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यात रोहित रघुनाथ पाटील हा तरुण त्याचा मित्र दीपक गंगाराम पाटील याच्यासोबत पाचोराहून जळगावकडे दुचाकीने जात होते. रस्त्यावरील बिल्ली फाट्याजवळील धरणाजवळ येत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली.