Rashmika Mandanna च्या बोल्ड फोटोशूटवर तुमचा देखील आक्षेप? पाहा फोटो

अभिनेता रश्मिका मंदाना  कायम आपल्या बोल्ड (Bold photoshoot) अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. ‘पुष्पा’ सिनेमातीची ‘श्रीवल्ली’ म्हणून देखील अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या  संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

आता देखील रश्मिकाने स्वतःचे तीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीने स्टायलिश लेहेंगा घातला आहे. अनेकांना रश्मिकाचा लूक आवडला आहे तर, अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे.

ग्लॅमरस (Bold photoshoot) फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘हळू-हळू आता व्यवसायाच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात…’ असं लिहिलं आहे. रश्मिकाच्या फोटोंवर 2 तासांत 15 लाखांपेक्षा जास्त लाईक्स आल्या आहेत. शिवाय कमेंटचा देखील वर्षाव होत आहे.

कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. कमेंटमध्ये एका युजरने ‘तुला बॉलिवूडची हवा लागली का?’ असं लिहीलं आहे. तर दुसरीकडे अनेकांनी अभिनेत्रीच्या नव्या लूकला पसंदी दर्शवली आहे. सध्या सर्वत्र रश्मिकाच्या तीन फोटोंची चर्चा आहे.

रश्मिका मंदाना (Bold photoshoot) लवकरच ‘पुष्पा द रुल’ सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘पुष्पा द रुल’ सिनेमाचा पहिला भाग ‘पुष्मा’ सिनेमाने प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं. महत्त्वाचं म्हणजे सिनेमा साऊथचा असला तरी बॉलिवूडमध्ये सिनेमाने कमालीचा गल्ला जमा केला. आता चाहते ‘पुष्पा द रुल’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आलेत.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म