Digital Payments डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी वाईट बातमी या ट्रान्झाक्शनवर येणार मर्यादा?

कोरोनानंतर अनेक जण कॅशलेस आणि डिजिटल ट्रान्झॅक्शनकडे (Digital Payments) वळले.मोठ्या प्रमाणात UPI आणि वेगवेगळ्या पेमेंट अॅपचा वापर चालू झाला. तुम्हालाही जर ही सवय असेल तर त्यावर आताच नियंत्रण आणा. याचं कारण म्हणजे UPI ट्रान्झॅक्शनवर आता लिमिट लागण्याची शक्यता आहे.

थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सकडून  चालविण्यात येणाऱ्या युपीआय पेमेंट सेवेसाठी एकूण व्यवहाराची मर्यादा ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याच्या निर्णयावर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रिझर्व्ह बँकेशी चर्चा करत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एनपीसीआयने 31 डिसेंबर ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.

हे वाचा : Rashmika Mandanna च्या बोल्ड फोटोशूटवर तुमचा देखील आक्षेप? पाहा फोटो

सध्या किती रुपयांपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता यासाठी कोणतीही मर्यादा (Digital Payments) ठेवण्यात आली नाही. अशा परिस्थितीत गुगल पे आणि फोनपे या दोन कंपन्यांचा मार्केट शेअर वाढून सुमारे 80 टक्के झाला आहे.नोव्हेंबर 2022 मध्ये, एनपीसीआयने मक्तेदारीचा धोका टाळण्यासाठी टीपीएपी 30 टक्के व्यवहारांवर मर्यादा घालण्याचा प्रस्ताव दिला होता.

याबाबत सर्व बाबींचा सर्वंकष विचार करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत एनपीसीआयच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अर्थ मंत्रालय आणि आरबीआयचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते. या अहवालानुसार, सध्या एनपीसीआय सर्व शक्यतांचे मूल्यमापन करत असून ३१ डिसेंबरची मुदत वाढविण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘एनपीसीआय’ला उद्योगातील भागधारकांकडून मुदत वाढवून देण्याबाबत विनंत्या प्राप्त झाल्या असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिनाअखेरपर्यंत यूपीआय (Digital Payments) पेमेंटवर मर्यादा लावण्यात येण्याची शक्यता आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म