Wednesday, June 25, 2025

crude oil : पेट्रोल डिझेल होणार इतक्या रुपयांनी स्वस्त?

मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारात  कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत चढउतार होत आहे. आज म्हणजेच सोमवारी देखील कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाली. जागतिक बाजारात कच्चा तेलाचे दर 80 डॉलरच्या खाली आले. दरम्यान, कच्चा तेलाचे दर कमी होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे  नवीन दर जारी केले आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात पेट्रोल 6 पैशांनी तर डिझेल  3 पैशांनी स्वस्त झालं आहे. याशिवाय गाझियाबादमध्ये पेट्रोलचे दर 18 पैशांनी घसरले आहेत. उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये देखील पेट्रोलचे दर 5 पैशांनी कमी झाले आहेत.

जागतिक बाजारात गेल्या 24 तासांत कच्चा तेलाचे (crude oil) दर प्रति बॅरल सुमारे तीन डॉलरने घसरल्या आहेत. याचा परिणाम गुरुवारी सकाळी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर झाला. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी उत्तरप्रदेशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. तर बिहारमध्ये इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

हे वाचा : 2 वर्षाच्या मुलीची मिठीत घेऊन हत्या, मृतदेहासह पित्याने तलावात घेतली उडी

दुसरीकडे देशातील पाच प्रमुख महानगरात पेट्रोल डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. मुंबई आणि दिल्लीत पेट्रोलचे भाव जैसे थे आहेत. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. पेट्रोलचे दर 65 तर डिझेलचे दर 66 पैशांनी कमी झाले होते. दरम्यान, कच्चा तेलाच्या (crude oil) दरात अशीच घसरण सुरू राहिल्यास पेट्रोल-डिझेलचे 5 रुपयांनी कमी होईल, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

चार महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
  • कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म