प्रवाशांना सेवा पुरवणाऱ्या एसटीत समाजातील विविध घटकांच्या सन्मानार्थ प्रवासी भाड्यात विशिष्ट प्रकारची सवलत दिली जाते. मात्र, या सवलतीसाठी त्या त्या घटकाचे ओळखपत्र दाखवावे लागत होते. सहा महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाने एक नवीन निर्णय घेऊन एसटीच्या प्रवासात सवलत पाहिजे असल्यास स्मार्ट कार्ड (Smart card) काढावे लागेल, असे जाहीर केले होते.
मात्र, अल्पावधीतच ही स्मार्ट कार्ड योजना थंड बस्त्यात पडली. आता स्मार्ट कार्ड नसेल तरी आधीप्रमाणेच कोणतेही ओळखपत्र दाखवून प्रवाशांना एसटी प्रवासाची सवलत मिळवता येणार आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 33 टक्क्यांपासून 100 टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत लागू करण्यात आली आहे.
यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसह दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्यसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त, अधिस्विकृती धारक अशा विविध सवलतधारकांचा समावेश आहे. या सवलतीसाठी प्रवाशांना स्मार्ट कार्ड (Smart card) अनिवार्य करण्यात आले होते.
प्रवाशांना सेवा पुरवणाऱ्या एसटीत समाजातील विविध घटकांच्या सन्मानार्थ प्रवासी भाड्यात विशिष्ट प्रकारची सवलत दिली जाते. मात्र, या सवलतीसाठी त्या त्या घटकाचे ओळखपत्र दाखवावे लागत होते. सहा महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाने एक नवीन निर्णय घेऊन एसटीच्या प्रवासात सवलत पाहिजे असल्यास स्मार्ट कार्ड काढावे लागेल, असे जाहीर केले होते.
मात्र, अल्पावधीतच ही स्मार्ट कार्ड (Smart card) योजना थंड बस्त्यात पडली. आता स्मार्ट कार्ड नसेल तरी आधीप्रमाणेच कोणतेही ओळखपत्र दाखवून प्रवाशांना एसटी प्रवासाची सवलत मिळवता येणार आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 33 टक्क्यांपासून 100 टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत लागू करण्यात आली आहे.
यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसह दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्यसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त, अधिस्विकृती धारक अशा विविध सवलतधारकांचा समावेश आहे. या सवलतीसाठी प्रवाशांना स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले होते.
स्मार्ट कार्ड (Smart card) योजना सुरू झाल्यापासून नागपूर जिल्ह्यातील 8 आगारात आतापर्यंत 59,536 स्मार्ट कार्ड तयार करण्यात आले. त्यातील आगारात प्राप्त झालेले कार्ड 53,020 एवढे, तर वितरित करण्यात आलेले 43,292 , आणि शिल्लक असलेले 9,728 अश्या स्वरूपात आहे.
एसटी प्रवासात सवलत मिळावी म्हणून संबंधित घटकांनी ते प्राप्त करून घेतले. स्मार्ट कार्ड बनवून घेणाऱ्यात अर्थात स्मार्ट कार्ड धारकांमध्ये सर्वाधिक संख्या ज्येष्ठ नागरिकांची आहे. काही अपरिहार्य कारणामुळे स्मार्ट कार्ड बनविणे बंद झाले असले तरी प्रवाशांना आधीप्रमाणेच जुन्या ओळखपत्रावर प्रवासी भाड्याची सवलत दिली जाणार आहे.
तसेच ज्यांच्या जवळ कार्डची मुदत संपली आहे अश्याचे रेनिव्हल 31 मार्चपर्यंत मुदत वाढ करून देण्यात आली आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती, एसटी महामंडळ नागपूरचे विभागीय नियंत्रण श्रीकांत गभने यांनी दिली.












