शहापूर येथील बालाजीनगर भागात खणीवरील (mine) घाणीचे साम्राज्य हटवताना जेसीबीच खणीत कोसळला. जेसीबीतील चालक आणि अन्य एकजण दोघेही पाण्यात बुडाले. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत त्यांना खणीतून बाहेर काढण्यात आले घटनास्थळी शहापूर पोलीस व महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक दाखल झाले.
तब्बल सहा तासानंतर क्रेनच्या साहाय्याने रात्री एक वाजण्याच्या सुमारास खणीतून जेसीबी बाहेर काढण्यास यश आले. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली.शहापूर भागात ठिकठिकाणी खणी आहे. अशाच बालाजीनगर भागातील असणाऱ्या खणीवर बुधवारी दिवसभर जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू होते.
हे वाचा : पॉलीग्राफनंतर आफताबची नार्को टेस्टही फेल? नवे खुलासे केले पण…
खणी (mine) भोवतालच्या घाणीचे साम्राज्य, साठलेले ढीग आणि वाढलेले तण काढले जात होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या जेसीबी मागे पुढे करताना जेसीबी खणीत कोसळला. जेसीबीतील चालक आणि अन्य एकजण असे दोघेही खणीच्या पाण्यात बुडाले. यानंतर मोठा आवाज झाल्याने आसपासचे नागरीक पावले. नागरिकांनी वेळीच दोघांना बाहेर काढल्याने जीव बाचला.
घटनास्थळी शहापूर पोलीस व आपत्कालीन पथक पोहचून जेसीबी बाहेर काढण्यासाठीप्रयत्न सुरू केले. विद्युत प्रकाश नसल्याने अडचण निर्माण झाली. क्रेनच्या साहाय्याने ही मोहीम पूर्ण करत बुध वारी रात्री उशिरा जेसीबी खणीच्या बाहेर काढण्यात आला.