आई-वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सोशल मीडियावर 50 मुलींचा घेत अज्ञात हेमलताला सापळ्यात अडकवून त्यांची हत्याकरून (Crime) तिच्या मृतदेहाला नवी ओळख देण्याचं काम एका तरुणीने केलं. ही कोणत्याही मालिकेची कथा नाही, तर ग्रेटर नोएडाच्या पायलची खरी सस्पेन्स थ्रिलर कथा आहे, जी टीव्ही शो पाहिल्यानंतर सीरियल किलर बनली.
खरं तर, 22 वर्षीय पायल भाटीने तिचा प्रियकर अजय ठाकूरसोबत अनेक लोकांच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, पहिल्या खुनानंतर ती पोलिसांच्या हाती लागली.सीरियल किलर बनण्यासाठी तयार असलेल्या पायलने संपूर्ण कट रचण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर टीव्ही सीरियल आणि अनेक गुन्हेगारी माहितीपटांची मदत घेतली.
पायलच्या आई-वडिलांनी यावर्षी मे महिन्यात आत्महत्या (Crime) केली होती. पायलने तिचा चुलत भाऊ सुनील, त्याची पत्नी स्वाती आणि तिच्या काही नातेवाईकांना तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूला जबाबदार मानले. तिला याचा बदला घ्यायचा होता. पण त्यांना मारण्याआधी तिच्यावर कुणाला संशय येऊ नये म्हणून तिला स्वतः मेल्याचं नाटक करायचे होते.
पायलने तिच्या प्रियकरासह स्वतःच्या मृत्यूचे नाटक रचले आणि तिच्यासारखी दिसणारी मुलगी शोधू लागली. यासाठी दोघांनी सोशल मीडियावर 50 हून अधिक मुली पाहिल्या, मात्र नंतर अजयला त्याच्या मित्रामार्फत हेमलताबद्दल माहिती मिळाली. आरोपींनी केवळ पैशाचं आमिष देऊन हेमलताची हत्या केली.
हे वाचा : सलग चौथ्या वर्षीही कोरोनाचं थैमान नव्या व्हेरिएंटविषयी WHO चा इशारा
सर्व काही ठीक चालले होते. मात्र 15 नोव्हेंबर रोजी बिसरख पोलीस ठाण्यात 28 वर्षीय हेमलता बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी तिचा मोबाईल बंद झाल्याने तिचा पत्ता लागला नसल्याचे मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले. पोलिसांनी अहवाल लिहून या प्रकरणाचा तपास करण्याच्या उद्देशाने हेमलता यांच्या मोबाईलचा सीडीआर काढला.
सीडीआर काढताच पोलिसांना या प्रकरणाचा पहिला सुगावा लागला. बेपत्ता होण्यापूर्वी तिचे अजय कुमार नावाच्या तरुणाशी शेवटचे बोलणे झाल्याचे पोलिसांना समजले. म्हणजे आता अजय कुमार पोलिसांच्या रडारवर होता.आता पोलिसांनी अजयला अटक करण्यासाठी सापळा रचला आणि 1 डिसेंबर रोजी ग्रेटर नोएडामधील चार मूर्ती गोलचक्कर येथून केवळ त्यालाच नाही तर त्याच्या प्रेयसीलाही पकडले.
पण या दोघांच्या अटकेने पायलच्या आत्महत्येची (Crime) कहाणीही 360 डिग्री फिरली. कारण, अजयसह पोलिसांनी ज्या मुलीला अटक केली ती दुसरी कोणी नसून पायल होती. तीच पायल… जिच्या आत्महत्येची बातमी १३ नोव्हेंबरला समोर आली होती.
पण हे कसे शक्य झाले? ज्या मुलीने १५ दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती, जिच्यावर कुटुंबीयांनी स्वतःच्या हाताने अंत्यसंस्कार केले होते, ती जिवंत कशी असेल? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे खरी कहाणी समोर येताच इतरांसह खुद्द पोलीस कर्मचारीही थक्क झाले.