इचलकरंजी पंचगंगा नदीत थेट मैलामिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याच्या कारणावरुन प्रदुषणनियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी विविध ठिकाणच्या प्रदुषित पाण्याचे (water pollution) नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. यावेळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील क्लोरिन टँकही बंद असल्याचे उघडकीस आले.
इचलकरंजी शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी टाकवडे वेस येथे एसटीपी प्रकल्प आहे.परंतु तो सध्या बंद असून मैलामिश्रित सांडपाणी थेट ओढ्याद्वारे नदीत सोडले जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी केली होती.
या तक्रारीची दखल घेत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रिय अधिकारी सचिन हरबट, निलेश मळभळ आदींचे पथक इचलकरंजीत आले होते. या पथकाने एसटीपी प्रकल्प, आमराई परिसर व टाकवडे ओढा परिसर या ठिकाणचे प्रदुषित पाण्याचे (water pollution) नमुने घेतले आहेत.