Sunday, April 20, 2025

5g smartphone खूपच स्वस्तात मिळतोय ‘हा’ तगडा 5G स्मार्टफोन, फीचर्सही झक्कास

प्रत्येक भारतीयपर्यंत हायस्पीड इंटरनेटची सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने काही महिन्यांपूर्वी 5G सेवेचा शुभारंभ करण्यात आला. 5G सेवेच्या माध्यमातून व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल्सपर्यंत मर्यादित न राहता त्यातून एक नवी क्रांती घडणार आहे.
ही सेवा उपलब्ध झाल्यामुळे आता प्रत्येक जण 5G फोन (5g smartphone) खरेदी करण्याला प्राधान्य देतोय.

सध्या बाजारात विविध कंपन्यांचे 5G फोन उपलब्ध आहेत. बहुतांशी स्मार्टफोन महागडे असल्याने अनेकांच्या बजेटमध्ये ते बसत नाहीत. परंतु, फ्लिपकार्टवर Infinix Hot 20 5G हा फोन अगदी वाजवी किमतीत मिळत आहे.बाजारातून सध्या 5G फोन विकत घ्यायचा असल्यास त्याच्या किमतीत सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसल्याचं चित्र आहे.

परंतु 5G नेटवर्कचा फोन घेण्याची इच्छा असल्यास फ्लिपकार्टवर सध्या बेस्ट डील उपलब्ध केली गेली आहे. इथं 12 हजारांपेक्षा कमी किमतीतही 5G फोन  (5g smartphone)मिळू शकतो. Infinix Hot 20 5G हा फोन नुकताच फ्लिपकार्टवर लिस्ट झाला असून तो विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हे वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ब्रिटनमधून परत आणणार: सुधीर मुनगंटीवार

या स्मार्टफोनच्या माध्यमातून कमी किमतीत 5G कनेक्टिव्हिटी सपोर्टसह 50 MP कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी मिळते. Infinix स्मार्टफोनमध्ये इतरही बरीच वैशिष्ट्ये आहेत, ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.स्मार्टफोनची नेमकी काय आहे ऑफर? ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर लिस्ट झालेल्या Infinix Hot 20 5G या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM आणि 65GB स्टोरेज आहे.

याची किंमत 17,999 रुपये असली तरी यावर 33 टक्के सवलत दिली गेलीय. त्यामुळे सध्या हा स्मार्टफोन 11,999 रुपयांत उपलब्ध झालाय. या फोनवर तब्बल 6 हजार रुपयांची सवलत मिळत आहे. बँक ऑफरचा विचार करता फ्लिपकार्टवर (5g smartphone) ॲक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पैसे दिल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळू शकते.

ईएमआयवर फोन खरेदी करत असाल तर केवळ 416 रुपये प्रतिमहिना द्यावे लागतील. कंपनीच्या वतीने या फोनवर 1 वर्षांची वॉरंटी मिळत आहे. एक्सेसरीजसोबत 6 महिन्यांची वॉरंटीही दिली जात आहे. Infinix Hot 20 5G फोनची वैशिष्ट्यं- Infinix Hot 20 5G स्मार्टफोनमध्ये 4GB RAM आणि 64GB ROM देण्यात आलं आहे.

मायक्रो एसडी कार्डद्वारे याला 1 TB पर्यंत वाढवता येऊ शकते. डिस्प्लेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास याचा डिस्प्ले 6.6 इंचाचा असून तो फूल एचडी आहे. कॅमेरा 50 MP असून AI लेन्सही उपलब्ध आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.बॅटरी 5000 mAh आहे. एकदा चार्ज केल्यानंतर दीर्घकाळापर्यंत चार्जिंगकडे पाहण्याची गरज उरणार नाही. याचा प्रोसेसरही उत्तम आहे. फोनमध्ये डायमेन्सिटी 810 प्रोसेसर देण्यात आलं आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म