Monday, April 21, 2025

petrol पेट्रोल-डिझलच्या दरात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. परिणामी आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशभरातील सर्व शहरांमध्ये वाहनांच्या इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, राष्ट्रीय बाजारपेठेतील पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol) जैसे थेच आहेत.

21 मे रोजी सरकारने पेट्रोल (petrol) आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केल्यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर दरात कोणताही बदल झालेला नाही. राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात.

शहराचे नाव पेट्रोल रु,लिट डिझेल रु,लि

  • दिल्ली 96.72 89.62
  • मुंबई 106.31 94.27
  • कोलकाता 106.03 92.76
  • चेन्नई 102.63 94.24

पेट्रोल-डिझेलचे दर रोज अपडेट होतात

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल (petrol) आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम  आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात. मात्र, अनेक दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम आहेत.

शहराचे नाव पेट्रोल रु.लिट डिझेल रु.लिटर

अजमेर –  108.43 – 93.67
श्रीगंगानगर – 113.65 – 98.39
पाटणा – 107.24 – 94.02
नोएडा – 96.57 – 89.96
चंदीगड – 96.20 – 84.26
गुरुग्राम – 97.18 – 90.05

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला  इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म