actress भाभी जी घर पर है फेम अभिनेत्रीच्या डोळ्यांची अशी झाली अवस्था…

‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारून लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे शुभांगी अत्रे. सध्या शुभांगी अत्रेविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीने (actress ) प्रकृतीच्या कारणामुळे ‘भाबी जी घर पर हैं’ मालिकेचं शूटिंग थांबवलं आहे. त्यामुळे तिचे चाहतेही तिला काय झालंय याविषयी चिंतेत आहेत. शुभांगीने तिला नक्की काय झालं आहे याविषयी एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

ETimes ला दिलेल्या मुलाखतीत शुभांगीने सांगितले की, तिने काही दिवस शोचे शूटिंग थांबवले आहे. ती म्हणाली, मला डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागामध्ये खूप आग होत आहे. बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे माझ्या डोळ्यात फोडही झाले आहेत. मला 6 डिसेंबर रोजी या जीवाणूची लागण झाली. त्यानंतर मी रजा घेतली, पण आता सनग्लासेस लावून शूटिंग सुरू करणार आहे.

हे वाचा : एका झटक्यात वाढेल Internet Speed, करा अशी सेटिंग

शुभांगीने (actress ) पुढे म्हणाली, मला खजुराहो फिल्म फेस्टिव्हलला जायचे होते तिथे ते माझा सत्कार करत होते. पण माझ्या डोळ्यांमुळे मला ते रद्द करावे लागले. मी तीन दिवस विश्रांती घेतली, पण अजूनही ती बरी झालेली नाही. पण काम चालूच राहिलं. आता मी सनग्लासेस घालून शूट करेन. अम्माजी अंगूरी भाभींना गॉगल घालायला सांगतील. यानंतर ती सनग्लासेससह शोची कथा पुढे नेणार आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म