अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दीक जोशी नुकतेच लग्नबंधनात (Entertainment) अडकले. 2 डिसेंबर रोजी दोघांनी पुण्यात लग्नगाठ बांधली. दोघांच्याही शाही लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलेला पहायला मिळाला.
त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत होते. हे लग्न चांगलंच चर्चेचा विषय ठरला. अशातच अक्षया आणि हार्दीक लग्नानंतर सप्तश्रुंगी देवीच्या मंदिरात पोहचले आहेत. त्यांनी नुकतेच मंदिरातील काही फोटो शेअर केले आहेत.
हे वाचा पतीला तुरुंगात पाठवून BF सोबत फरार झाली 5 मुलांची आई; महिलेचं धक्कादायक कांड
अक्षया आणि हार्दीकडे त्यांच्या इन्स्टाग्रामवर (Entertainment) वणीच्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला गेल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. नवदाप्त्यांच्या या फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली. दोघांचा खास मराठमोळा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस येत आहे. त्यांची ही पोस्ट क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाली असून पोस्टवर भरभरुन लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.