भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी (cricket) सामना रंगतदार अवस्थेत आहे. टीम इंडिया हा सामना सहज तीन खेळाडूंच्या जोरावर जिंकण्याची शक्यता अधिक आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे.
टीम इंडियाने या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दोन विकेट्सवर 258 धावा करुन आपला दुसरा डाव घोषित केला आणि बांग्लादेशसमोर 513 धावांचे अत्यंत मोठे आव्हान ठेवले आहे. खेळाच्या चौथ्या दिवशी सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या गोलंदाजांवर असणार आहेत.
या कसोटीत (cricket) टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 404 धावा ठोकल्या. याला प्रत्युत्तर देताना बांग्लादेशी फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. गोलंदाज कुलदीप यादव हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. पहिल्या डावात 16 षटके टाकताना त्याने 40 धावा देऊन 5 बळी घेतले. 22 महिन्यांनंतर कसोटी संघात पुनरागमन करताना त्याने हा धमाका केला आहे.
हे वाचा महाराष्ट्र दहावी, बारावीचे शिक्षण महागणार…?
बांग्लादेशचा संघ चौथ्या दिवसाचा खेळ 42 धावांनी पुढे सुरू करेल. अशा स्थितीत भारतीय चाहत्यांच्या नजरा सुरुवातीच्या तासात युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर असतील. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात घातक गोलंदाजी करताना बांग्लादेशच्या फलंदाजांना खूप त्रास दिला होता. पहिल्या डावात 13 षटकात गोलंदाजी करताना त्याने केवळ 20 धावा दिल्या आणि 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
या सामन्यात टीम (cricket) इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आर अश्विन हा भारताचा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. पहिल्या डावात त्याला एकही बळी घेता आला नाही. पण जहूर अहमद चौधरी स्टेडियमच्या खेळपट्टीवर चौथ्या दिवशी आर अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरू शकतो. रविचंद्रन अश्विनच्या नावावर कसोटीत एकूण 442 विकेट आहेत. त्याचा हा अनुभव भारतीय संघासाठी खूप उपयोगी ठरणार आहे.