काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलच्या लावणी (Dance) कार्यक्रमात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळं आता गौतमी पाटीलच्या लावणीवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गौतमी पाटील लावण्यांमध्ये अश्लिल नृत्य करत असल्याचा आरोप सातत्यानं केला जातो. याच कारणावरून तिला एकदा माफीही मागावी लागली होती. याशिवाय गौतमीच्या लावणी कार्यक्रमात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचीही घटना समोर आली होती.
त्यानंतर आता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर महाराष्ट्रात कायमस्वरुपी बंदी घालण्याची मागणी राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत लक्ष्मण सदामते यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळं आता गौतमी पाटीलच्या लावणीच्या (Dance) कार्यक्रमांवरून वादंग पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे वाचा : आज या वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र
सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडगमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात दत्तात्रय ओमासे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळं या प्रकरणातही तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सदामते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महाराष्ट्राच्या लावणी (Dance) परंपरेला आणि संस्कृतीला छेद देत लावणीत गौतमी पाटील अश्लिल नृत्य करते. अश्लिल हावभावाचे तिचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरांत पोहचत आहेत. त्यामुळं हे प्रकार रोखण्यासाठी तिच्या कार्यक्रमांवर संपूर्ण महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी प्रशांत सदामते यांनी केली आहे.
लावणीच्या कार्यक्रमातून गौतमी पाटील अश्लिल हातभाव आणि अश्लिल नृत्य करत असल्यानं तिच्या प्रत्येक कार्यक्रमात मोठी गर्दी होत असते. त्यामुळं परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील निर्माण होत होत असल्याचं सदामते यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात गौतमी पाटीलच्या लावणीचा (Dance) कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असल्यानं बीडमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. याशिवाय जमावानं दगडफेक केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यामुळं आता गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.