गेल्या बऱ्याच दिवसांपासून पहायला मिळतंय की बॉलिवूडकरांची (Bollywood) जादू कमी झालीये. यंदाच्या वर्षी बरेच सिनेमे चालले नाहीत. त्यामुळे नेटकऱ्यांनीही बॉलिवूडवर निशाणा करायला सुरुवात केलीये. याउलट साऊथ सिनेमांची क्रेझ वाढली असून साऊथ सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत.
त्यामुळे साऊथ वर्सेस बॉलिवूड अशी तुलना सुरु झालीये. आता यावर केजीएफ चॅप्टर 2 मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा चित्रपट अभिनेता यश याने आपलं मत मांडलं आहे.अभिनेता यश याने कर्नाटकातील लोकांना बॉलिवूडचा अपमान करू नका असे आवाहन केले आहे. कर्नाटक चित्रपटसृष्टीही अशाच समस्यांमधून गेली असल्याचं यश म्हणाला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना यशने लोकांना आवाहन केले की, आपण उत्तर आणि दक्षिणेची तुलना करणे थांबवावं. यशची प्रतिक्रिया सध्या चांगलीच व्हायरल होत असून त्याच्या वक्तव्याविषयी त्याचं कौतुकही केलं जात आहे.केजीएफ चॅप्टर 2 अभिनेता (Bollywood) यश फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत म्हणतो, ‘मी कर्नाटकातील लोकांना आवाहन करतो की, कोणत्याही उद्योगाला निराश करू नका, नावे ठेवू नका. कारण आम्हालाही अशा समस्यांचा सामना करावा लागला आहे.
आम्ही खूप मेहनत केली आहे आणि सन्मान मिळवला आहे. आता आपण इतर कोणाचाही अपमान करू शकत नाही. आपण सर्वांचा आदर केला पाहिजे. आपण बॉलिवूडचा आदर केला पाहिजे. उत्तर आणि दक्षिण विसरा. बॉलिवूडची चेष्टा करणे बंद करा. ते चांगले नाही.’
यश पुढे म्हणतो की, चांगल्या देशातून असल्यामुळे आपण उत्तम चित्रपट (Bollywood) आणि थिएटर बनवायला हवेत. आणि त्याच वेळी, आपली एकमेकांशी तुलना करण्याऐवजी, आपण एकत्रितपणे जगात चांगले कसे करू शकतो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
दरम्यान, यशचा चित्रपट ‘KGF 1′ जो 2018 साली आला होता, त्याचा सिक्वेल ‘KGF Chapter 2’ या वर्षी रिलीज झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली. यशने रॉकी भाई बनून प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.